Wednesday, 13 July 2022

ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर, जिल्हा प्रशासनाचा निर्णय !

ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर, जिल्हा प्रशासनाचा निर्णय !


भिवंडी, दिं,१४, अरुण पाटील (कोपर) :
            ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इयत्ता १२ वी पर्यंतच्या शाळांना गुरूवार (आज) आणि शुक्रवार अशा दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीकोनातून बुधवारी रात्री उशीरा ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी हा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यात बुधवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.


             या संततधार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी
साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच पाणी साचल्यामुळे राहादरीचे मार्ग बंद पडले आहे. तसेच जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे येत्या दोन दिवसात अशाच पद्धतीने मुसळधार पाऊस झाला तर बदलापूर आणि आसपासच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरण्याची  शक्यता वर्तविली जात आहे.
              त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ठाणे जिल्हाप्रशासनाने गुरूवार आणि शुक्रवारी अशा दोन दिवस इयत्ता १२ पर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी हा निर्णय घेतला.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्रा.सं. कक्ष घाटकोपर पश्चिमच्यावतीने वॉर्ड क्र.१२३ चे नवनिर्वाचित नगरसेवक सुनील मोरे यांचा सत्कार !

शिवसेना ग्रा.सं. कक्ष घाटकोपर पश्चिमच्यावतीने वॉर्ड क्र.१२३ चे नवनिर्वाचित नगरसेवक सुनील मोरे यांचा सत्कार ! मुंबई (शांताराम गुड...