म्हारळ येथील प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक मा. सुनील देशमुख यांना वाढदिवस अभीष्टचिंतन !
कल्याण तालुक्यातील म्हारळ येथील अतिशय पारदर्शक, सुशील, कार्यशील, गावची परंपरा जपणारे, सर्वगुण संपन्न, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व, समाजसेवक मा. सुनील भाऊ देशमुख यांचा आज जन्मदिवस ....
अगदी तरुण वयात १७ व्या वर्षापासून व्यवसायात उतरलेले आजचे यशस्वी व्यक्तिमत्व तरुण उद्योजक, बांधकाम व्यावसायिक मा. सुनील भाऊ देशमुख आज पंचक्रोशीत कोणालाही कुठलीही अडचण आली तर मदतीसाठी धावून येतात. म्हारळ येथे कामगार, कष्टकरी अशा मध्यमवर्गीयांची वस्ती आहे. कोरोना काळात तर येथील नागरिकांवर अत्यंत बिकट परिस्थिती ओढावली असताना मा. सुनील भाऊ देशमुख यांनी येथील सर्व सामान्य लोकाना खूप आधार दिला अगदी अन्यधान्यापासून हॉस्पिटल तसेच आवश्यक तिथे आर्थिक मदत सुध्दा केली. आजही परिसरातील जनतेला भाऊंचा खूप आधार वाटतो. भाऊ त्यांचावर कोणताही प्रसंग ओढवला किंवा काहिही अडचण आली तर सुनील भाऊ हक्काने उभे रहातात.
आजही सुनील भाऊ व ह्यांचे पाच भाव॔डाचे कुटुंब एकत्र रहातात. खरखरोच मा. सुनील भाऊ देशमुख हे व यांचे कुटुंबीय यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. अशा सुनील भाऊ देशमुख यांचा जन्म दिवस हा तसा खासच म्हणून आज त्यांना सकाळपासून अनेक प्रतिष्ठित, राजकीय व सामाजिक नेते, कार्येकर्ते तसेच परिवारातील सर्व सामान्य नागरिक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मा. श्री सुनील भाऊ देशमुख यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा..
अमोल यशवंतराव, म्हारळ

No comments:
Post a Comment