सुजित शेठ नलावडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा !
कल्याण, बातमीदार : समाजसेवक व उद्योगपती सुजित नलावडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला.
त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यसम्राट नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली. पुष्पगुच्छ देऊन व केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आले. सुजित नलावडे हे डोंबिवली शहरातच नव्हे तर अख्या कल्याण डोंबिवली शहरांमध्ये समाजकार्यासाठी ओळखले जातात. नेहमी लोकांची मदत करणे हे त्यांचे ध्येय. कोरोना काळात देखील त्यांनी जनतेची भरपूर मदत केली. म्हणूनच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजारोंच्या संख्यांमध्ये लोकांनी गर्दी केली होती.
सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:
Post a Comment