चोपडा शहरात पाणी पुरवठा नियोजन करा चार चार दिवसांनी पाणी पुरवठा करा ! "भारतीय कम्युनिस्ट पक्ष"
चोपडा, बातमीदार.. नगरपालिका पाणी पुरवठ्याचे नियोजन लोकनियुक्त सत्ता व प्रशासक काल असताना काहीच फरक दिसत नाही असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जाहीर केलेल्या पत्रकात नमूद केले आहे...
..पत्रकात म्हटले आहे की,
चोपडा नगरपालिकेने फिल्टर प्लांट करून शहरातील नागरिकांना शुद्ध पेयजल ही योजना अमलात आणली आहे. तालुक्याची जलपातळी इतर तालुक्याच्या मानाने बरी आहे. पण गेल्या पाच वर्षापासून दर सात दिवसानी पाणीपुरवठा होत आहे. आणि अलीकडे तर पाणीपुरवठाची एक दिवस वाढ होत आहे, पाणीपुरवठा स्रोत चांगला असताना व पावसाळ्याचे दिवस असताना पाणीपुरवठ्याचे दिवस कमी होत नाही. उलट एक एक दिवस वाढतच जातात चाललय काय? अशी प्रूच्छा भारतीय कम्युनिस्ट पक्ष ने केली आहे? नगरपालिकेने किमान चार दिवसाच्या आत पाणी दिले पाहिजे. शेजारच्या अंमळनेर तालुक्यात तसेच शिरपूर तालुक्यात पाणीपुरवठा मुबलक होत असताना चोपडा आठ-आठ दिवसांनी पाणी मिळते. लोकनियुक्त नगरपालिका प्रशासन सरकार नियुक्त प्रशासक राजवट हयात काहीच बदल नाही ..लोकांना ८/८ दिवस पाणी मिळत असलेले तेवढ्या दिवसाचे पाणी साठवून ठेवणे शक्य नसते ते शेजारचे वार्डात पाणी आले असता घागरी बादल्या घेऊन पायपीट करत असतात. नगरपालिका प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याप्रकरणी लक्ष घालावे दर ४ दिवसांनी पाणी पुरवठा करावा, अशी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कॉम्रेड अमृतराव महाजन, बाळू लोहार, सुमनबाई माळी, समाधान धनगर, गणेश माळी, संजू पारधी आदींनी केली आहे .

No comments:
Post a Comment