Friday, 26 August 2022

मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपचे विविध आणि स्तुत्य असे कौतुकास्पद आणि प्रेरणादायी उपक्रम ; *प्रसाद शिंपी* याच्या वाढदिवसा निमित्ताने अंध, अपंग, महिलांना साडी वाटप आणि गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन !!

मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपचे विविध आणि स्तुत्य असे कौतुकास्पद आणि प्रेरणादायी उपक्रम ; *प्रसाद शिंपी* याच्या वाढदिवसा निमित्ताने अंध, अपंग, महिलांना साडी वाटप आणि गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन !!


कल्याण, (प्रतिनीधी) : मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे प्रमुख आर.एस.पी.अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी व महिला बालविकास प्रकल्प सहाय्यक प्रकल्प अधिकारी सौ. संगीता मनीलाल शिंपी यांचे सुपुत्र कु. प्रसाद मनिलाल शिंपी याच्या १५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण शहर व परिसरातील अंध अपंग महिलांना साडी वाटप. तसेच गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम स्वामीनारायण सभागृह शिवाजी चौक कल्याण येथे शनिवार दि. २७/०८/२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता करण्यात आले आहे.


मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे मुख्य संयोजक, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील व स्वामीनारायण मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ.दिनेश भाई ठक्कर यांचा प्रेरणेने हा साडी वाटप व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


चि. प्रसाद याचा जन्म खरतर गणपती बाप्पाच्या स्थापनेच्या दिवशी म्हणजे श्री.गणेश चतुर्थीला झाला आहे, आणि बाप्पाने डॉ. मनिलाल शिंपी व सौ. संगीता शिंपी यांना खऱ्या अर्थाने सुपुत्र प्रसाद हा प्रसादाच्या रूपाने दिला आहे असे म्हणायला वावगं ठरू नये. म्हणून सुपुत्र प्रसादच्या वाढदिवसा निमित्ताने गरीब गरजूंना मदत करावी ही संकल्पना मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपच्या माध्यमातून स्तुत्य असे उपक्रम राबवून इतरांना प्रेरणा मिळावी हाच खरा या पाठीमागचा उद्देश आहे असे मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख डॉ. श्री. मनीलाल रतिलाल शिंपी यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरणशी बोलताना सांगितले.


कु. प्रसाद मनीलाल शिंपी यास दैनिक स्वराज्य तोरण परिवार, स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट, मानव सेवा हीच ईश्वर सेवा ग्रुप व स्वामीनारायण ट्रस्ट, आणि दैनिक समर्थ गावकरी परिवारा च्या वतीने मंगलमय वाढदिवसाच्या मनःपूर्वक लाख लाख शुभेच्छा व पुढील वाटचालीस सदिच्छा. ..

सौजन्य : संदीप शेंडगे ; +91 77386 95112

No comments:

Post a Comment

अवयवदान एक संकल्प - जनजागृतीच्या मार्गावर सुनील देशपांडे

अवयवदान एक संकल्प - जनजागृतीच्या मार्गावर सुनील देशपांडे  वयाच्या साठाव्या वर्षानंतर म्हणजेच ज्येष्ठ नागरिक (सीनियर सिटीजन झाल्य...