मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येथील व्यास क्रिएशन्स् प्रकाशन संस्थेने घरगुती श्री गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा विनामूल्य असून कोकण प्रांतातील मुंबई, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी मर्यादित आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या स्पर्धेची घोषणा केली आणि अल्पावधीतच गणेशभक्तांनी भरघोस प्रतिसाद नोंदवला आहे.
व्यास क्रिएशन्स् प्रकाशन संस्था नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबवते. पर्यावरणाचे रक्षण आणि संतुलन राखण्यासाठी आपणही सतर्क राहिले पाहिजे आणि इतरांनाही प्रोत्साहित केले पाहिजे, या भावनेने ही स्पर्धा आयोजित करीत आहोत. समविचारी नागरिकांचा उत्साह पाहून आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया संचालक नीलेश गायकवाड यांनी व्यक्त केली. ही स्पर्धा नवतरुणांना समाजाभिमुख बनविण्यासाठीचे एक पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया सहआयोजक राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या सीईओ वैशाली गायकवाड यांनी दिली.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.विजेत्या स्पर्धकांना भरघोस बक्षिसे व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.ज्यांनी अजून नोंदणी केली नाही त्यांनी 8652233676 किंवा 9967637255 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि नियम अटी जाणून घ्याव्यात असे आवाहन संचालकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment