'छायाचित्रकारांना होणाऱ्या त्रासाबाबत संघटना उठवणार आवाज'
मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
राजकीय बीट तसेच अन्य फिल्डवर काम करणाऱ्या छायाचित्रकारांच्या अधिकृत संस्था पॉलिटिकल फोटो जर्नलिस्ट असोसिएशनच्या लोगोचे लोकार्पण विधानभवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश जाधव, सचिव स्वप्नील शिंदे, सचिन हळदे, विद्याधर राणे, महेश पोळ, आमदार भरत गोगावले, अब्दुल सत्तार, दिलीप लांडे तसे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असोसिएशनच्या सर्व सदस्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. फिल्डवर काम करत असताना छायाचित्रकाराना होणाऱ्या त्रासा बाबत संस्थेच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निवेदन देखील मांडले. तसेच छायाचित्रकाराना आणि त्यांच्या परिवाराला कोरोना काळात झालेल्या शारीरिक , मानसिक आणि आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी संघटना विशेष सहाय्य करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी सांगितले. तर अनेक वृत्त छायाचित्रकार हे स्वतःच्या घरापासून वंचित असून त्यांना त्यासाठी मदत करणे , त्यांच्या स्वास्थ्यासाठी विम्याची उपलब्धि करून देणे या आणि इतर मागण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत तसेच वेळोवेळी होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात संघटनेकडून आवाज उठवणार असल्याचे संस्थेचे सचिव स्वप्नील शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
No comments:
Post a Comment