जव्हार- जितेंद्र मोरघा :
धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिन निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी प्रदीप वाघ यांनी सांगितले की शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणी प्रमाणे समाजसेवा करण्याचा प्रयत्न हा शिवसैनिक नेहमी करत असतो हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे.
शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख वैभव संखे यांनी आम्हाला सामाजिक कार्य करण्यासाठी नेहमीच मदत केली आहे, उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद काका कदम यांच्या सहकार्याने मोखाडा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात असेही प्रदीप वाघ यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच संजय वाघ, चेअरमन नंदकुमार वाघ, काशिनाथ कामडी, हरी कामडी, नरेंद्र वाघ, गणेश खादे, हरेश शिंदे, सुरेश पोकळे, बंडु पोकळे, शंकर पोकळे, शिक्षीका सरीता ढेरे, शिक्षक मनोहर पावरा सर यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment