Friday, 26 August 2022

अनुसुचित जमातीच्या युवकांकरीता लॅमिनेशन मशिनचा पुरवठा करणे !

अनुसुचित जमातीच्या युवकांकरीता लॅमिनेशन मशिनचा पुरवठा करणे !


जव्हार- जितेंद्र मोरघा :
                                                                                                            
अनुसुचित जमातीच्या युवकांकरीता लॅमिनेशन मशिनचा पुरवठा करणे या योजनेसाठी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,जव्हार जि.पालघर अंतर्गत जव्हार,मोखाडा,विक्रमगड व वाडा या चार तालुक्यातील अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रांसह या कार्यालयात दि.29.08.2022 ते दि.09.09.2022 या कालावधीत विहीत नमुन्यात अर्ज सादर करण्यात यावे. 
                                        अटी व शर्ती तसेच कागदपत्रांबाबत तपशिल 
1) लाभार्थी हा अनुसुचित जमातीचाच असावा त्याच्याकडे स्वत:चा जातीचा दाखला असावा.
2) अपंग लाभार्थ्यांना 3 टक्के आरक्षणानुसार प्राधान्य देण्यात येईल.
3) उमेदवार किमान इ.10 वी पास/नापास असावा.
4) उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष असावे.
5) उमेदवाराची स्वत:ची जागा असावी/किराणा दुकाण/ सुविधा केंद्र/ संगणक केंद्र किंवा भाडयाची जागा घेण्याची तयारी असावी.
6) लाभार्थ्याने सदर योजनेचा लाभ यापुर्वी या कार्यालयाकडुन घेतलेला नसावा.
7) लाभार्थ्यांचा रहीवाशी दाखला असावा.
8) अर्जदाराच्या नावे नाहरकत दाखला असणे आवश्यक आहे.
9) लाभार्थ्याचे आधारकार्ड , बँक पासबुक , जागेचा दाखला व रेशनकार्ड च्या छायांकीत प्रती अर्जासोबत सादर कराव्या.
10) अंतिम लाभार्थी निवडीबाबतचे व योजनेच्या अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी,जव्हार यांनी सर्व अधिकार राखुन ठेवण्यात आले आहेत.
11) विहीत नमुन्याचे लाभार्थी अर्ज कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

No comments:

Post a Comment

चिमुकली वरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी- आमदार राजेश मोरे

चिमुकली वरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी- आमदार राजेश मोरे  डोंबिवली, प्रतिनिधी - क...