Friday, 26 August 2022

महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन !

महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन !


कल्याण, बातमीदार : मुरबाड तालुक्यातील दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी मुरबाड शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड यांच्या वतीने ॲमेझॉन, फ्लिपकार्ट कंपनीचे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्या दरम्यान सुमारे ६८० जणांची नाव नोंदणी करण्यात आली तर सुमारे साडेचारशे ते पाचशे जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे व पालघर जिल्हा विभागीय महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा ऋताताई जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित सर्वाना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ज्योतीताई हिंदुराव, युवा नेते प्रतिक हिंदुराव, सौरभ हिंदुराव, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, मुरबाड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शैलेश वडनेरे, जेष्ठ समाजसेवक जुगल शेठ जाखोटिया, मुरबाड तालुका अध्यक्ष राजाभाऊ सासे, मुरबाड शहर अध्यक्ष दिपक वाघचौडे, सेवादल जिल्हा अध्यक्ष जगन गायकर, कामगार सेल जिल्हा अध्यक्ष गणेश म्हात्रे, कामगार सेल विधानसभा अध्यक्ष विजय मोहिते, कामगार सेल तालुका अध्यक्ष अजय देशमुख, अंबरनाथ कामगार सेल अध्यक्ष प्रशांत गायकवाड, युवक जिल्हा उपाध्यक्ष हर्षद शेळके, मुरबाड शहर युवती अध्यक्षा सुवर्णा व्यापारी, मुरबाड शहर सामाजिक न्याय अध्यक्ष विलास जाधव, मुरबाड शहर कार्याध्यक्ष तेजस व्यापारी, तालुका उपाध्यक्ष मनीष हिंदुराव,राहुल हिंदुराव, सुनील भांडे,गजानन घरत, विजय हलपतराव, संजय हिंदुराव आदी पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्या दरम्यान मोफत नेत्र तपासणी शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले होते.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

चिमुकली वरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी- आमदार राजेश मोरे

चिमुकली वरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी- आमदार राजेश मोरे  डोंबिवली, प्रतिनिधी - क...