Friday, 26 August 2022

ढोल ताशाच्या तालावर फुटली कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक येथे भव्य मानाची दहीहंडी ! "भाजपाचे सौरभ गणात्रा आणि विकी गणात्रा" यांच्या वतीने दहीहंडीच भव्य आयोजन....

ढोल ताशाच्या तालावर फुटली कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक येथे भव्य मानाची दहीहंडी !

"भाजपाचे सौरभ गणात्रा आणि विकी गणात्रा" यांच्या वतीने दहीहंडीच भव्य आयोजन....


कल्याण, बातमीदार  : कल्याण शहर आणि ग्रामीण भागात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या भावभक्तीत साजरा झाला. त्यानंतर ठिकठिकाणी खासगी २६३ तर ५२ ठिकाणी सार्वजनिक अशा एकूण ३१५ दहीहंड्या विविध गोविंदा पथकांनी फोडल्या. पंचायत राजमंत्री खासदार कपिल पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाने भाजपाचे सौरभ गणात्रा आणि विकी गणात्रा यांच्या वतीने सहज आनंद चौकात भव्य दिव्य अशी मानाची दहीहंडी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी आपला सहभाग नोंदवत सलामी दिली. संपूर्ण ११ लाखाच्या दहीहंडी मध्ये पथकांना आकर्षक पारितोषिके सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. आयोजित भव्य दिव्य दहीहंडी उत्सवात पारंपारिक आगरी कोळी नृत्यासह लावणी हे कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. विकी आणि सौरभ यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
 यावेळी याप्रसंगी आपले उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे व तसेच सर्व भाजपा आजी-माजी नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि गेल्या दोन वर्षाची कमी भरून काढण्यात आली. हजारोच्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी सेफ्टी बेल्ट मेडिकल अनेक गोष्टींची सोय करण्यात आली.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

उडान फेस्टिव्हल गीत गायन स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील मुरडव गावची सुकन्या आर्या गांगरकर प्रथम क्रमांकाची मानकरी !!

उडान फेस्टिव्हल गीत गायन स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील मुरडव गावची सुकन्या आर्या गांगरकर प्रथम क्रमांकाची मानकरी !! ** ३६ शांळाच्या सहभागात...