पातेपिलवली- कळंबट एसटी बस वेळेत सोडण्याची विद्यार्थ्यांची मागणी चिपळूण आगार प्रमुखांना दिले थेट निवेदन !
[गुहागर/ निवोशी- उदय दणदणे] :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चिपळूण आगारातून दुपारी १ वाजता सुटणारी पातेपिळवली-कळंबट एसटी चिपळूण आगाराच्या ढिसाळपणा नियोजनामुळे वेळेत सुटत नाही. त्यामुळे ही बस ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास कळंबट येथें पोचते. सदर बस वेळेवर येतं नसल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी येत असतात. परतीचा प्रवास करताना बस वेळेत येत नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एसटी बसची वेळेवर सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील बस वेळेत सोडाव्यात असे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. ही गैरसोय दूर करून विध्यार्थ्यांना बस सुविधा वेळेत द्यावी. अशी मागणी विद्यार्थी पालक व गावातील ग्रामस्थ करत आहेत. पातेपिळवली-कळंबट विद्यार्थी व पंचायत समिती चिपळूण माजी उपसभापती शरदजी शिगवण, पत्रकार सचिन घाणेकर, सोपान शेट, यांनी चिपळूण डेपो मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले आहे. बस वेळेवर सोडण्याचे नियोजन नाही झाल्यास थेट बस स्थानकामध्ये मोर्चा काढण्यात येईल असे सांगण्यात आले. सदर निवेदनाची दखल आगार प्रमुख तात्काळ घेतील अशा अपेक्षेत विद्यार्थी असून चिपळूण आगार प्रमुखांच्या निर्णायक नियोजनाकडे सर्व विद्यार्थ्यांचे व ग्रामस्थ प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.
No comments:
Post a Comment