Tuesday, 2 August 2022

डि वाय फाऊंडेषनतर्फे रुग्णांवर मोफत उपचार !

डि वाय फाऊंडेषनतर्फे रुग्णांवर मोफत उपचार !


कल्याण, बातमीदार : कल्याणच्या रुग्णांना मोफत उपचार घेण्यासाठी आता इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही, कारण कल्याणच्या डॉ. आंबेडकर रोड येथे डीवाय फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे जनसंपर्क कार्यालय काँग्रेसचे जिल्हा सचिव जलील मणियार यांच्या हस्ते सुरू करण्यात आले आहे. 
डीवाय फाऊंडेशनच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती प्रियांका दयानंद चोरघे यांच्या कमळाच्या फुलांचा केक कापून जनतेसाठी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कोरोनाच्या काळात जनतेला सर्वतोपरी मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचा कोविड योद्धा गौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, कंपाऊंडर यांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच छत्री वाटपही करण्यात आली.
कार्यालयाच्या माध्यमातून गरीब गरजू रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत तसेच ॲन्जीओग्राफी व ॲन्जीओप्लास्टी ऑपरेषन मोफत केले जाणार आहेत अशी माहिती जलील मणियार यांनी दिली आहे. 
या योजनेचे उद्घाटन डीवाय फाऊंडेशनचे संस्थापक दयानंद मोतीराम चोरघे, श्रीमती प्रियांका दयानंद चोरघे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सचिव जलील मणियार यांचे आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत आंबेडकर रोड, अन्सारी चौक विभाग परिसरातून नगरसेवक निवडून आणल्याबद्दल अभिनंदन केले तसेच जलील मणियार दयानंद चोरघे यांना डीवाय फाऊंडेशनसह काँग्रेस पक्षाच्या पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले. 
जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे राज्य अधिकारी गुलाबचंद मणियार, साहिल मणियार, पप्पू मणियार, सईद अतार, रशीद पटेल, ज्येष्ठ काँग्रेस सदस्य हाजी अहमद डायरे, वसीम शेख सॅंडो, सद्दाम अन्सारी, सलमान मणियार, वाजिद मणियार, सोलिहा खान, मलिका शाह, फातेमा घडियाली, शरीफा खान, अस्मा शेख, हसन शेख आदी उपस्थित होते.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...