Tuesday, 30 August 2022

मुंबई, ठाण्यासह राज्यात या भागात पावसाच्या पुनरागमनाची शक्यता !

मुंबई, ठाण्यासह राज्यात या भागात पावसाच्या पुनरागमनाची शक्यता !


पुणे, प्रतिनिधी :  राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र ३१ तारखे पासून मुंबई पुण्यासह पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश जवळपास सर्वच विभागात हलका ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला पावसाची हजेरी लागू शकते.

येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर ०१ सप्टेंबपासून राज्यात पावासाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक, अहमदनगर, सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यात ३१ तारखेपासून ते ५ सप्टेंबर पर्यंत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच खानदेश मधील धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे. याशिवाय बुलढाणा, अमरावती, अकोला, जालना, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment

उडान फेस्टिव्हल गीत गायन स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील मुरडव गावची सुकन्या आर्या गांगरकर प्रथम क्रमांकाची मानकरी !!

उडान फेस्टिव्हल गीत गायन स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील मुरडव गावची सुकन्या आर्या गांगरकर प्रथम क्रमांकाची मानकरी !! ** ३६ शांळाच्या सहभागात...