Tuesday, 30 August 2022

भिवंडी-कल्याण शिळफाटा सहा पदरी रस्त्याच्या वाढीव खर्चास राज्य शासनाची मान्यता, त्यामुळे होणार वाहतूक कोंडी कमी !

भिवंडी-कल्याण शिळफाटा सहा पदरी रस्त्याच्या वाढीव खर्चास राज्य शासनाची मान्यता, त्यामुळे होणार वाहतूक कोंडी कमी !


भिवंडी, दिं,३०, अरुण पाटील (कोपर) :
          भिवंडी ते कल्याण शिळफाटा या रस्त्याचे सहापदरी रुंदीकरण करण्यासाठी ५६१ कोटी रुपयांच्या वाढीव खर्चास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या कामासाठी राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला ( एमएसआरडीसी) हा निधी देण्यात येणार आहे.
           भिवंडी ते कल्याण -- शिळफाटा या २१ कि.मि. लांबीच्या रस्त्याचे सहापदरी रुंदीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. प्रकल्प अहवालानुसार उड्डाणपुल, रेल्वेवरील पुल, पुलाचे पोचमार्ग, जंक्शन सुधारणा, सूचना फलके व तत्सम अनुशंगिक कामासाठी ३८९ कोटी ६३ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु कल्याण शहरातील रेल्वे पत्री उड्डाण पुलाच्या कामात झालेली वाढ, तसेच रस्त्याचे डांबरीकरणाऐवजी क्रांक्रीटीकरणाने सहापदरी रुंदीकरण करणे, इतर नवीन कामांची भर पडल्यामुळे तसेच बांधकाम खर्चात वाढ झाले आहे.
            प्रकल्पाचा एकूण खर्चही वाढला आहे. त्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव एमएसआरडीसीने राज्य शासनाकडे पाठविला होता. राज्य शासनाने या आधी एमएसआरडीसीला १०५ कोटी रुपये दिले होते, ते वजा करून उर्वरित ४५६ कोटी ८५ लाख रुपये राज्य शासनाच्या निधीतून एमएसआरडीसीला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

No comments:

Post a Comment

चिमुकली वरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी- आमदार राजेश मोरे

चिमुकली वरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी- आमदार राजेश मोरे  डोंबिवली, प्रतिनिधी - क...