Wednesday, 31 August 2022

सहाय्यक गटविकास अधिकारी रमेश अवचार यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात, चार ते पाच तालुक्यातून उपस्थिती !

सहाय्यक गटविकास अधिकारी रमेश अवचार यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात, चार ते पाच तालुक्यातून उपस्थिती !


कल्याण, (संजय कांबळे) : मुरबाड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी रमेश अवचार यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी ठाणे जिल्ह्यातील तसेच पालघर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.


बुलढाणा जिल्ह्यात जन्मलेले रमेश अ. अवचार यांनी जिल्हा परिषदेच्या सेवेत ग्रामसेवक म्हणून सुरुवात केली, यानंतर विस्तार अधिकारी, बालविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, गटविकास अधिकारी आणि जिल्हा समाजकल्याण अधिकारी अश्या विविध पदावर त्यांनी आतापर्यंत ३६ वर्षे ऐवढी प्रदिर्घ सेवा केल्यानंतर नुकतेच ते मुरबाड पंचायत समिती मध्ये  सहाय्यक गटविकास अधिकारी या पदावरून सेवा निवृत्त होत आहेत. त्यांनी अंबरनाथ, डहाणू, पालघर, कल्याण, ठाणे, आणि मुरबाड आदी ठिकाणी सेवा दिली असून, गोरगरीब, आदिवासी, कष्टकरी इत्यादी हजारो लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.


त्यांच्या या सेवापूर्ती समारंभ सोहळ्यात मुरबाड चे तहसीलदार संदिप आवारी यांनी आपण आपल्या जीवनात श्री अवचार यांना आदर्श माणत असून मी सेवेत असेपर्यंत माझ्या तोंडातून केवळ अभिमानाने त्यांचे नाव निघेल असे सांगितले. तर मुरबाड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी ही त्यांच्या मितभाषी स्वभावाचे कौतुक केले. अश्या गुणी अधिका-याच्या सेवापूर्ती सोहळ्यास उपस्थित राहणे हे माझे व तूमचं भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.


तर सत्कार सोहळ्याला उत्तर देताना रमेश अवचार हे लाभलेल्या प्रेमामुळे भारावून गेले होते, ते म्हणाले, मी माझ्या आयुष्यात कधी कोणाचे वाईट केले नाही, तशी वेळ आली नाही, ग्रामसेवक किंवा कर्मचाऱ्यांचे काही चुकले तर समजावून सांगितले, लोकांची कामे वेळत पुर्ण केली, दोन शब्द प्रेमाचे व आपुलिचे वापरले तक्रार अजिबात झाल्या नाही, पंचायत राज मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीईओ, डेप्युटी सीईओ, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, झेडपी सदस्य, आदी पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले असे बोलून त्यांनी सगळ्याचे त्रुण व्यक्त केले.

यावेळी झेडपी सदस्य सुभाष घरत, उल्हास बांगर, सभापती स्वरा चौधरी, नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे,माझी सभापती श्रीकांत धुमाळ, दत्तू वाघ, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, गटविकास अधिकारी श्वेता पालवे,आदींची भाषणे झाली,

या सोहळ्याला रामभाऊ दळवी, स्नेहा घरत, अनिल घरत, रिपाइंचे दिनेश उघडे,सिमा घरत, कल्याण चे पत्रकार संजय कांबळे, ग्रामसेवक संघटनेचे सचिव नितीन चव्हाण, ठाणे, पालघर, डहाणू, अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड येथील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, पत्रकार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एखाद्या अधिका-यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास इतकी प्रंचड उपस्थिती हे तालुक्यातील पहिलीच घटना असल्याचे अनेकांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

चिमुकली वरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी- आमदार राजेश मोरे

चिमुकली वरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी- आमदार राजेश मोरे  डोंबिवली, प्रतिनिधी - क...