Saturday, 27 August 2022

अमळनेरच्या नऊ हुतात्मा अभिवादन करून ; 'ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां'चे काम बंद आंदोलन जिल्ह्यात सुरू !! *नामदार गिरीश महाजन यांना दिले निवेदन*

अमळनेरच्या नऊ हुतात्मा अभिवादन करून ; 'ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां'चे काम बंद आंदोलन जिल्ह्यात सुरू !! 

*नामदार गिरीश महाजन यांना दिले निवेदन*  


जळगाव, बातमीदार : जळगाव जिल्ह्यातील हजार ग्रामपंचायतीत कार्यरत शिपाई, पाणीपुरवठा, क्लार्क, सफाई कर्मचारी, यांना गेल्या चार महिन्यापासून राज्य शासनाकडून पगार नाहीत, ग्रामपंचायत कडून पगाराचे हिस्सा मिळत नाही व ग्रामपंचायत उत्पन्नातून उपस्थित पस्तीस टक्के रक्कम खर्च केले जात नाही. आदि मूळ मागणी सह मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे राज्य शासनाकडे पाठपुरावा चालू आहे. परंतु कर्मचाऱ्यांकडे शासनाचे लक्षच नाही म्हणून शेवटी २७ ऑगस्ट २०२२ पासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. 


याबद्दल सविस्तर अशी की '२७ ऑगस्ट २०२२' हा अंमळनेरच्या ऐतिहासिक मिल कामगार यांच्या गौरवशाली लढ्याचा  स्मृती दिवस आहे. ७६ वर्षांपूर्वी शेखलाल नथू नावाच्या कामगाराला मिल व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकल्यामुळे त्याच्या नोकरीच्या शाश्वतीसाठी कामगारांनी पाठिंबा दिला व अमळनेर मध्ये चार हजार कामगारांनी मिरवणूक काढली त्यावर गोरा डीएसपी डेविड यांने बेछूट गोळीबार केला त्यात कॉम्रेड श्रीपत पाटील व नऊ सहकारी शहीद झाले त्या शहिदांना अभिवादन करण्यासाठी सकाळी अकरा वाजता लालबावटा ऑफिस बळीराम पेठ या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मेळावा वयोवृद्ध कामगार नेते काँ. काळू कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झाला कामगार नेते महासंघाचे राज्य सचिव काँ. अमृत महाजन यांनी मार्गदर्शन केल्यानंतर सर्व हुतात्मा जोरदार घोषणा देऊन अभिवादन करण्यात आले.


नंतर उपस्थित कामगारांच्या शिष्टमंडळ जथा राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात गेला. तेथे त्यांचे प्रतिनिधी पितांबर भावसार व होनाजी चव्हाण यांना नामदार महाजन यांच्याशी संपर्क केल्यानंतर निवेदन देण्यात आले. निवेदनाची एक प्रत मामा भोळे यांनाही दिली त्यावेळी श्री विनोद आढळते यांनी मदत केली.


नाथाभाऊ यांचे महासंघातर्फे आभार.....

ना. महाजन यांना निवेदन देण्याआधी कर्मचाऱ्यांची बैठक संपर्क कार्यालयात घेण्यात आली तेथे जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते आमदार नाथाभाऊ खडसे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जळगाव जिल्हा परिषदेत वर्ग, तीन वर्ग, चार पदी, दहा टक्के आरक्षणाच्या जागा गेल्या तीन-चार वर्षांपासून रिक्त आहेत यासाठी जो आवाज उचलला उठवला याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले..


बैठकीत कॉम्रेड अमृत महाजन यांनी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारासाठी पुणे येथे जो पाठपुरावा केला.
त्याची माहिती देऊन जिल्हा परिषदेला आणि नामदार ग्रामीण विकास मंत्री यांना काम बंद आंदोलनाचे जे निवेदने दिले. त्याबद्दल माहिती दिली या बैठकीत ठरले असेही की, ज्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित राहणीमान भत्तासह पगार देतात त्या कर्मचाऱ्यांनी काल्या फिती लावून काम करावे आणि उर्वरित कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन नेटाने चालवावे असे आवाहन महासंघातर्फे करण्यात आले.


नामदार गिरीश महाजन यांना भेटायला गेलेल्या शिष्य मंडळात कॉ. अमृतराव महाजन यांचे नेतृत्वात शेख मोखत्यार, शेख रशीद, महेंद्र धनगर, रवींद्र पाटील, सुरेश पाटील, प्रदीप जोशी, विश्वास पाटील, रतिलाल पाटील, सुभाष सोनवणे, अनिल तडेले राहुल शिंदे, ईश्वर पाटील, नागो पाटील, किशोर इंगळे, जयेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर सातपुते, जगदीश कन, देविदास सोनवणे, दिलीप पाटील, गोकुळ पाटील, आदी चोपडा धरणगाव, जळगाव, भुसावल, यावल, या तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता.

No comments:

Post a Comment

पत्रकार भीमराव धुळप “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !

पत्रकार भीमराव धुळप “प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२४” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित ! मुंबई (उत्कर्ष गुडेकर) :         आधुनिक...