जव्हार- जितेंद्र मोरघा :
नांदगाव पैकी राजेवाडी ठाकूर वाडी येथे हिरवा देव आगमनाची तयारी पूर्ण झाली असून या वर्षी ही हिरवा देवाचा उत्सव ७ दिवस चालणार आहे. हिरवा देव सेवाभावी संस्था नांदगाव (राजेवाडी) यांच्याकडून आदिवासी संस्कृती जतन व्हावी व पुढच्या पिढीला संस्कृती व आपल्या देवता माहिती व्हावी यासाठी गेल्या चार वर्षांपासून या उत्साहाची सुरुवात केली आहे. या वर्षी हिरवा देव उत्सव अध्यक्ष पदी शंकर झुगरे यांची निवड तर उप अध्यक्ष पदी धर्मा बरतड तर सल्लागार म्हणून संजय भला व एकनाथ दरोडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उस्तव पार पडणार आहे तरी या उत्सवाची रूपरेषा
३० तारखेला हिरवा देव व निसर्गाची पूजा करून स्थापना केली जाईल व २/०९/२०२२ तारखेला जागले गुरुजी यांचे समाज प्रबोधन होईल तर ०५/०९/२०२२ रोजी हिरवा देव उत्सवाची सांगता होईल. या उत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आणि भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते तरी भाविकांनी या वर्षी ही आपल्या कुल दैवत हिरवा देवाच्या दर्शनासाठी नांदगाव पैकी राजेवाडी येथे अवश्य भेट द्या .
No comments:
Post a Comment