केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री यांना शिक्षक भरती संदर्भात निवेदन !
जव्हार- जितेंद्र मोरघा :
केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री विश्वेश्वर टूडू यांना पालघर जिल्ह्यामध्ये पेसा अंतर्गत शिक्षक भरती, पालघर जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय, जव्हार मध्ये कृषी महाविद्यालय, नामांकित शाळांमधील इयत्ता दहावी पास झालेल्या परंतु अकरावीला प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांबाबत निवेदन, तसेच आरोग्य विभागामध्ये रखडलेली पद भरती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी या संदर्भात निवेदन देण्यात आले. पालघर जिल्हातील पेसा शिक्षक भरती होत नसल्याने ग्रामिण भागातील मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री यांना माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले, नंदकुमार पाटील, हेमंत सवरा, विठ्ठल थेतले, रवी थेतले आणि जव्हार तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यांनी शिक्षण भरती संदर्भात निवेदन देण्यात आले.

No comments:
Post a Comment