बुलडाणा, दि. २५ : हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त यावर्षीही २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन, व्याख्यानमाला, राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार, मान्यवरांचे खेळाडूंना मार्गदर्शन, विविध खेळाचे प्रात्यक्षिक आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हॉकी स्पर्धेसाठी सहकार विद्या मंदिर, बुलढाणा, स्पर्धा संयोजक सय्यद आबीद, फुटबॉल स्पर्धेसाठी एडेड हायस्कूल, बुलढाणा, राहुल औशालकर, सिकई-वुशू, स्वयंसिध्दा प्रात्यक्षिकासाठी अरविंद्र अंबुसकर, मैदानी खेळासाठी जिल्हा क्रीडा संकुल येथे विजय वानखेडे, गणेश जाधव, समाधान टेकाळे, खो-खो स्पर्धेसाठी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलढाणा, सागर उबाळे, हॅण्डबॉल स्पर्धेसाठी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलढाणा मनोज श्रीवास, प्रणव काठोके, आर्चरी स्पर्धेसाठी तालुका क्रीडा संकुल, बुलढाणा, चंद्रकांत इलग, कबड्डी स्पर्धेसाठी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलढाणा, गोपालसिंग राजपूत, वसंतराव धोरण, बॉक्सिंग स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा संकुल, राज सोळंकी, मोहम्मद सुफीयान, व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी प्रबोधन विद्यालय, रविंद्र गणेशे, फुटबॉल आणि खो-खो स्पर्धेसाठी श्री शिवाजी विद्यालयाचे क्रीडांगण संदीप पाटील आदी खेळाच्या प्रदर्शनीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच तालुकास्तरावर तालुका क्रीडा संकुल येथे विविध कार्यक्रम आणि वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले आहे.
शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, क्लब, संघटना, प्रशिक्षण केंद्र आदी ठिकाणी खेळाडूनी शारदा ज्ञानपीठ, बुलढाणा येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
अधिकृत एकविध खेळ संघटनेतर्फे आयोजित अधिकृत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य आणि सहभाग घेतलेल्या खेळाडूंनी प्रमाणपत्राची छायांकित प्रत क्रीडा कार्यालयास दि. २८ ऑगस्ट २०२२ पर्यंत सादर करावी, तसेच दि. २९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७.३० वाजता शारदा ज्ञानपीठ, बुलडाणा येथे उपस्थित राहावे. क्रीडादिनाच्या कार्यक्रमासाठी शारदा ज्ञानपीठ, बुलडाणा येथे सकाळी ८ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment