Thursday, 25 August 2022

भिवंडी 'तहसीलदार श्री. अधिक पाटील' यांच्यावर वाढदिवसा निमित्त शुभेच्छांचा वर्षांव !

भिवंडी 'तहसीलदार श्री. अधिक पाटील' यांच्यावर  वाढदिवसा निमित्त शुभेच्छांचा वर्षांव !

     भिवंडी तहसीलदार श्री. अधिक पाटील यांना         वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देताना अरुण पाटील

भिवंडी, दिं,२५, अरुण पाटील (कोपर) :
           भिवंडीचे तहसीलदार श्री. अधिक पाटील यांना वाढदिवसा निमित्त गुरुवारी तालुक्यातील सर्व जाती धर्मातील शुभचिंतकांनी व पत्रकारांनी पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी भ्रमणध्वनी वरून शुभेच्छा दिल्या.
           या वेळी शुभेच्छा देणाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारुन श्री. अधिक पाटील यांनी केक देऊन त्यांचे तोंड गोड केले. येवढ्या मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांच्या वर्षावाचे सर्वात मोठे मुख्य कारण म्हणजे श्री. अधिक पाटील यांनी आपल्या कडे कामा निमित्त येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे कामा संदर्भात समाधान केले, त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. त्यामुळे त्यांची जनमाणसात प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यांनी कधीच उच -नीच, गरीब -श्रीमंत असे पहिले नाही. त्यामुळे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी आज सकाळ पासूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तहसीलदार कार्यालयात रिघ लावली होती.
         श्री. अधिक पाटील हे कधीच कोणावर जोराने रागावलेले दिसले नाही, कधीच उद्धट-उलट वर्तन  नाही, त्यांचा शांत, मनमिळाऊ स्वभाव, मृदू भाषा, येणाऱ्यांचे शांतपणे ऐकून घेणे, त्या बाबत योग्य मार्गदर्शन करणे, योग्य सल्ला देवून त्यांच्या प्रश्नांचे समाधान करणे, त्यामुळे त्यांच्या विषयी सर्व सामान्यांच्या मनात आदर निर्माण झाला आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त सर्व जाती धर्मातील सर्व सामान्यांपासून ते पत्रकारांपर्यत सर्वांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. तर काहींनी यायला जमले नसल्यानं त्यांनी आपल्या खाजगी माणसांकरवी पुष्पगुछ पाठवून शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...