Thursday, 25 August 2022

आशा व गटप्रवर्तक स्त्री परिचर यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व थकीत मोबदल्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेवर २९ ऑगस्ट रोजी धरणे !

आशा व गटप्रवर्तक स्त्री परिचर यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व थकीत मोबदल्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेवर २९ ऑगस्ट रोजी धरणे !


जळगाव, प्रतिनिधी :- आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना आयटक जिल्हा शाखा जळगाव जिल्हा चे वतीने आशा व गटप्रवर्तकांचा २९ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता जळगाव जिल्हा परिषदेवर प्रचंड धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे. अशी माहिती जळगाव जिल्हा आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेने प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. पत्रकार पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तक यांचे मार्चपासूनचे मानधन मोबदला कोविड भत्ते प्रोत्साहन भत्ते थकीत असून ते मिळावेत मोबाईल रिचार्ज दर तीनशे रुपये करावेत. अंगणवाडी आशा वर्कर यांना अँड्रॉइड मोबाईल पुरवावेत. ते मिळेपर्यंत आशा गटपरवर्तक स्वतःचे मोबाईल वापरतात म्हणून त्यांना दरमहा दोनशे भाडे देण्यात यावे टी एडीए देण्यात यावे जिओ ट्रकर ची सक्ती बंद करावी. या स्थानिक मागण्यासह सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सवलती द्याव्यात त्याचे प्रमाणे विना मोबदल्याची काम सांगू नये, आरोग्य खात्यात रिक्त जागा रिक्त जागा पदी अशा व गटप्रव्रतकांना जागा राखून ठेवाव्यात. स्त्री परिचर यांचे थकीत मोबदला मिळावा आदि मागण्यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले असून या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तक स्त्री परिचय यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन त्याचप्रमाणे जिल्हा संघटक सुलोचना साबळे, मालू नरवाडे, मीनाक्षी सोनवणे, मीनाक्षी सोनवणे, मनीषा पाटील, शिवबा पाटील,  रंजना सांगोरे, सुरेखा महाजन, कल्पना महाले, जोत्सना खंबायत, शारदा महाजन, मुक्ता महाजन, श्रीमती गायकवाड, प्रतिभा नेहेरकर, प्रतिभा पाटील, शालिनी पाटील, विद्या पाटील, सुनंदा ठाकरे, अर्चना पाटील, नीता महाजन, कविता सरोदे, नाजीम बी, संजना गोडघाटे, पल्लवी पाटील, गोजर पाटील, वंदना पाटील, वंदना सोनार, पुष्पा ठाकूर, ज्योती कापूरे, मिणा महाले, हसीना तडवी, विद्यादेवी बाविस्कर, कविता कोळी, साधना पाटील, संगीता पाटील, माधुरी भारंबे, संगीता माळी, प्रमिला कोळी, बबिता बारेला, सविता सरोदे, रत्ना कोळी, मीनाक्षी धांडे आदीं आशा व गटप्रवर्तक स्त्री परिचर प्रतिनिधी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...