Thursday, 25 August 2022

एज्युकेशन टुडे फाउंडेशनच्या वतीने नांदिवली स्थित शाळेत गोकुळाष्टमी साजरी !

एज्युकेशन टुडे फाउंडेशनच्या वतीने नांदिवली स्थित शाळेत गोकुळाष्टमी साजरी !


कल्याण, प्रतिनिधी : एज्युकेशन टुडे फाउंडेशनच्या वतीने नांदिवली स्थित शाळेत गोकुळाष्टमी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. जन्माष्टमी उत्सवात शाळेतील सर्वच १४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात क्षणी मुले खूप आनंदी व उत्साही दिसत होते. लिटिल आर्यन्सच्या मुलांसाठी तर हा सण म्हणजे एक पर्वणीच होईल. शाळेतील सगळे बाळ-गोपाळ प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील मुले व मुली श्रीकृष्ण व राधाचा पोशाख परिधान करून आले होते. शाळेत ती शाळा नसून गोकुळच आहे की काय असा भास होत होता. लिटिल आर्यन्स परिसरात श्रीकृष्णाच्या जीवनातील अनेक प्रसंगाचे सादरीकरण करण्यात आले. 
लग्न बाळकृष्ण कालिया मर्दान राधाकृष्ण अशा अनेक प्रसंगाचे हुबेहूब चित्र व सजावट करण्यात आली अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते. संदीप आणि आश्रमातील मुलांनी गीतेच्या श्लोकांचे पठण केले. चिन्मय सरगम समूहाने कृष्ण भजन गायले. मुलींनी मंत्रमुग्ध करणारे नृत्य सादर केले तसेच शाळेत आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये सुद्धा विद्यार्थिनींनी भाग घेतला भगवान श्रीकृष्णांचा आवडता पदार्थ लोणीचा प्रसाद शाळेतील सर्व बाळ गोपाळ यांना वाटण्यात आला.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...