**रेसिटेक्स कंपनी कामगारांना दिली भरघोस पगार वाढ **
मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : मुरबाड औद्योगिक क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून सिटुच्या लाल झेंड्यानी कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी पदार्पण केले.आणि बघता बघता अनेक कंपनीच्या कामगारांनी ते स्विकारले. न्यायासाठी लढाया सुरु झाल्या. राष्ट्रीय पातळीवरील डॉ. डी.एल.कराड साहेबांसारखे नेते मुरबाड सारख्या ठिकाणी प्रत्यक्षात सहभागी होऊन, कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहु लागले. दिवसेंदिवस संघटना बाळसं धरु लागली. मात्र मालक धार्जिण्या लोकांनी तिला सुरुंग लावण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. धानिवली येथील टेक्नो सारख्या कंपनी कामगारांचा संघर्ष सुरु झाला. दोन-तिन वर्ष लढा सुरु राहिला. प्रतक्षात जमिन जागा देऊन, कंपनीने नोक-यांबरोबरच गावाच्या सर्वांगीण विकासाचा करार पायलळी तुडवला, संघर्ष पेटला, रोजीरोटी साठी महिला, मुले, उन्हातान्हात कंपनी गेटवर आंदोलन करीत होती. पण राजकारण एवढे शिगेला पोहचले. कि, कंपनी व्यवस्थापनाने प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात ठेवून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. विनाकारण कामगारांवर खोटे गुन्हे दाखल केले. उपाशीपोटी चाललेले आंदोलन किती दिवस तग धरणार, आमदार, खासदार ही कामगारांसाठी व्यवस्थापनाकडे अर्जव विनंत्या करून शांततेने आंदोलन शमविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र गेंड्याच्या कातडीच्या मँनेजमेंटने कामगारांना मजबुर करून त्यांची रोजीरोटी संपुष्टात आणत त्यांना हिशोब घेण्यास भाग पाडले. तोपर्यंत सिटु संघटना कामगारांच्या पाठीशी ठाम राहिली. त्याच विश्वासावर आणि ताकदीवर आज शनिवार दि. 30/07/2022 रोजी मे. रेसीटेक्स लि., मुरबाड या कारखान्यातील सिटु युनियन व कंपनी व्यवस्थापन यांच्यातील भरघोस पगारवाढ व सोयीसवलतीच्या बोलणीला सिटूला संघटनेला यश आले..
*संघटनेने कामगारांना दिलेली पगार वाढ हि एप्रिल २०२२ला २०००रू, एप्रिल २०२३ ला १३०० रू, एप्रिल २०२४ ला ११०० रू, २०२५ ला ११०० रू अशी ५५०० रूपयेची पगारवाढ, कायमस्वरूपी कामगार, बोनस, सुट्या, कपडे, सेफ्टी शुज, वैद्यकीय विमा आणि महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र शासनाचा दर ६ महिन्यानी वाढणारा डी.ए. *(महागाई भत्ता) या सर्वच मागण्या यशस्वी चर्चा करून मिळवण्यात* *सन्मा.डाॅ.डि.एल.कराड साहेब यांच्या नेतृत्वात सिटू संघटनेला यश आलेले आहे! आणि या सर्व मागण्यांचा मसुदा तयार करून त्यावर सिटूचे राष्ट्रिय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष* *सन्मा. काॅम्रेड. डाॅ. डि. एल. कराड, उपाध्यक्ष काॅम्रेड. देविदास आडोळे, म.ई. ऊद्योग, कामगार संघटना जनरल सेक्रेटरी काॅम्रेड. विजय विशे, शहापुर ता. कार्याध्यक्ष काॅम्रेड. अशोक विशे, मुरबाड तालुका अध्यक्ष काॅम्रेड. दिलीप कराळे, कंपनी* *व्यवस्थापक मॅनेजींग डायरेक्टर मा. श्री.शसिध्दांत सेक्सारिया, जनरल मॅनेजर मा. श्री. ईम्तीयाज हुसेन, सिटू युनियन फॅक्टरी कमिटी मेंबर्स काॅ. संजय थोरात, काॅ. संदिप ढमणे, काॅ. राजेश आळीकल या सर्वांच्या सह्या होवुन पगारवाढीचा करार लागु करण्यात आला आहे. हा करार ०१ एप्रिल २०२२ ते ०१एप्रिल २०२५ पर्यंत अमंलात आला आहे. यावेळी कामगारांना कराराबाबत सविस्तर असे मार्गदर्शन करतांना काॅम्रेड. देविदास आडोळे, काॅम्रेड. विजय विशे, काॅम्रेड. अशोक विशे, काॅम्रेड.दत्ता राक्षे, काॅम्रेड. दिलीप कराळे यांनी केले. यावेळी सर्व सोयीसवलती मिळाल्याबद्दल कामगारांनी आनंद व्यक्त केले व सिटू युनियनचे आभार मानले.
११०० रू, २०२५ ला ११०० रू अशी ५५०० रूपयेची पगारवाढ, कायमस्वरूपी कामगार, बोनस, सुट्या, कपडे ,सेफ्टी शुज, वैद्यकीय विमा आणि महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र शासनाचा दर ६महिन्यानी वाढणारा डी.ए.* *(महागाई भत्ता) या सर्वच मागण्या यशस्वी चर्चा करून मिळवण्यात* *सन्मा. डाॅ. डि. एल. कराड साहेब यांच्या नेतृत्वात सिटू संघटनेला यश आलेले आहे ! आणि या सर्व मागण्यांचा मसुदा तयार करून त्यावर सिटूचे राष्ट्रिय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष* *सन्मा. काॅम्रेड. डाॅ. डि. एल. कराड, उपाध्यक्ष काॅम्रेड. देविदास आडोळे ,म.ई. ऊद्योग, कामगार संघटना जनरल सेक्रेटरी काॅम्रेड. विजय विशे, शहापुर ता. कार्याध्यक्ष काॅम्रेड. अशोक विशे, मुरबाड तालुका अध्यक्ष काॅम्रेड. दिलीप कराळे, कंपनी* *व्यवस्थापक मॅनेजींग डायरेक्टर मा. श्री. सिध्दांत सेक्सारिया, जनरल मॅनेजर मा. श्री. ईम्तीयाज हुसेन, सिटू युनियन फॅक्टरी कमिटी मेंबर्स काॅ. संजय थोरात, काॅ. संदिप ढमणे, काॅ. राजेश आळीकल या सर्वांच्या सह्या होवुन पगारवाढीचा करार लागु करण्यात आला आहे. हा करार ०१ एप्रिल २०२२ ते०१ एप्रिल २०२५ पर्यंत अमंलात आला आहे. यावेळी कामगारांना कराराबाबत सविस्तर असे मार्गदर्शन करतांना काॅम्रेड. देविदास आडोळे, काॅम्रेड.शविजय विशे, काॅम्रेड. अशोक विशे, काॅम्रेड. दत्ता राक्षे, काॅम्रेड.दिलीप कराळे यांनी केले. यावेळी सर्व सोयीसवलती मिळाल्याबद्दल कामगारांनी आनंद व्यक्त केले व सिटू युनियनचे आभार मानले.
मुरबाडकर कामगारांच्या न्याय हक्कासाठी लाभलेले सिटूचे राष्ट्रिय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष सन्मा. डाॅ. डि. एल. कराड साहेब तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष काॅम्रेड. सिताराम ठोंबरे, राज्य सचिव काॅम्रेड. देविदास आडोळे, जनरल सेक्रेटरी काॅम्रेड. विजय विशे, काॅ. संतोष काकडे,काॅ. तुकाराम सोनझे, काॅ. दत्ता राक्षे, काॅ.अशोक विशे, काॅ.सागर भावार्थे या सर्व पदाधिकार्यांचे मार्गदर्शन व सहकार्य तसेच रेसिटेक्स कमिटी व कामगारांनी एकजुट दाखविल्यामुळे हा पगार वाढीचा करार यशस्वी*
केल्याबद्दल सर्व सिटू युनियन पदाधिकारी,फॅक्टरी कमिटी मेंबर व कामगारांचे काॅ.दिलीप कराळे* (मुरबाड ता. अध्यक्ष, सिटू), कॉ. सागर भावर्थे (मुरबाड ता.सरचिटणीस) यांनी आभार मानले.



No comments:
Post a Comment