Wednesday, 21 September 2022

'भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ या पुस्तकाचे प्रकाशन !

'भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ या पुस्तकाचे प्रकाशन !


मुंबई, बातमीदार : माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते डॉ. तुषार कांती बॅनर्जी लिखित ‘भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ या पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, श्रीमती सविता कोविंद, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

साधेपणा, विनयशीलता आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा सन्मान म्हणजे त्यांच्यावरील 'भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ हे पुस्तक होय, असे गौरवोद्गार माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी काढले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वाला आणि व्यापक कार्याला साजेसे शीर्षक असलेले 'भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ हे पुस्तक वाचकांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देणारे आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...