Wednesday, 21 September 2022

समाज कल्याण विभागात सेवा पंधरवड्याचे आयोजन !

समाज कल्याण विभागात सेवा पंधरवड्याचे आयोजन !


बुलडाणा, दि. २१ : समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयातर्फे दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा आणि कर्तव्यपथ पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.
या पंधरवाड्याच्या अनुषंगाने अनुसूचित जाती मुले, मुलींच्या शासकीय निवासी शाळा व मागासवर्गीय मुले, मुलींचे शासकीय वसतिगृहात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कर्तव्यपथ मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरात उपस्थित कर्मचाऱ्यांना सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी मार्गदर्शन केले.
तसेच अनुसूचित जाती मुले, मुलींच्या शासकीय निवासी शाळा आणि मागासवर्गीय मुले, मुलींचे शासकीय वसतिगृह येथील कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मुळ सेवापुस्तक तपासणी आणि अद्यावत करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
तसेच मागासवर्गीय मुले, मुलींचे शासकीय वसतीगृहाचे खात्यांतर्गत प्रलंबित परिच्छेद आणि भांडार पडताळणी प्रलंबित परिच्छेदाची पुर्तता करून अनुपालन सादर करण्याबाबत गृहपालांना मार्गदर्शन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...