Thursday, 22 September 2022

दोन्ही हात गमावूनही सुनीता पवार या नवदुर्गेने तिला शाळेत धाडलं, पण मुलगीच नको म्हणून नव-याने तिलाचं सोडलं !

दोन्ही हात गमावूनही सुनीता पवार या नवदुर्गेने तिला शाळेत धाडलं, पण मुलगीच नको म्हणून नव-याने तिलाचं सोडलं !


कल्याण, (संजय कांबळे) : सध्या नवरात्र उत्सव धुमधडाक्यात सुरू होणार आहे. स्त्रीला आदीशक्ती म्हणून ९ दिवस वेगवेगळ्या रुपात पुजले जाईल. परंतु प्रत्यक्षात मात्र खरेच असे काही होते का?महिलांना त्यांचा मान सन्मान मिळतो का? असे प्रश्न उपस्थित करण्यामागचे कारण देखील तितकेच महत्त्वाचे व गंभीर आहे, यामुळे पुरुष प्रधान संस्कृती चे रुप समोर आले आहे. तेही विदयेचे माहेरघर, सुसंस्कृत शहर, पुणे तेथे काय उणे आदींचा टेंभा मिरवणाऱ्या पुणे शहरात !


सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी पुणे शहरात इमारतीच्या कामावर मजुरी करण्याच्या निमित्ताने सुनीता ही पुण्यात आली, याच कामातील ठेकेदार दशरथ पवार यांच्या बरोबर १६/१७ वर्षाची असतानाच विवाह झाला, अशिक्षित, अडाणी अंधश्रद्धा आणि गरीबी यामुळे सज्ञान पणा काय असतो हे कोणाला माहिती?


अशातच सुनीता ही ६/७ महिन्याची गरोदर असताना तिला कामात दुसऱ्याला मदत करताना विजेचा शाँक लागला, तो इतका जबरदस्त होता की, जीव वाचवायचा असेल तर दोन्ही हात कापणे हा एकच पर्याय डॉक्टरांकडे होता, त्यामुळे तिचे दोन्ही हात कापण्यात आले. ती आता पुर्णपणे नव-यावर अवलंबून राहिली.

अशातच तिचा नवरा दशरथ पवार याला दारुचे व्यसन लागले, हे कमी की काय, म्हणून त्याला कोणीतरी सांगितले की, तूझ्या बायकोला मुलगी होणार, यामुळे तो पूरता वैतागून गेला, बायको अपंग, त्यात मुलीचा त्रास, तीला हुंडा, लग्न, या विचाराने तो ग्रासला व यावर पुन्हा अपत्ये नको म्हणून दोघा  मध्ये कटके उडू लागले सुनीता बाळंत झाली व तिला मुलगीच झाली यामुळे तर दशरथ अजूनच बिथरला तरीही याकडे दुर्लक्ष करून तिने मुलीचा चांगल्या प्रकारे पालनपोषण केले. पण एक, दिवस तो अचानक सुनीताला अशा अवस्थेत सोडून निघून गेला. तिच्या वर दु:खाचा डोंगर कोसळला.

या अत्यंत अडचणीच्या काळात पिंपळे सौदागर कोकणी चौक, पुणे येथील हाँटेल गोविंद गार्डन चे मालक बापू काटे, भरत काटे, यांनी ३ वर्षे ३ वेळचे जेवण हिला पुरविले, एक छोटी पत्र्याची शेड राह्याला दिली.

आज या घटनेला १५/१६ वर्षे झालीत, पण तरीही न डगमगता, सर्व दैनंदिन कामे, सुनीता कोणाचाही आधारा शिवाय करते, अगदी महिलांची धुणीभांडी, स्वयपाक, छोटी मोठी कामे ती बिनधास्त करते, आपल्या दोन्ही हात नाही म्हणून ती हाताश, निराश होऊन नशिबाला दोष देत बसली नाही, तर या नैसर्गिक अपंगत्वावार मनातील जबरदस्त इच्छाशक्ती, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीने मात करून समस्त अबला समजणाऱ्या महिलांसाठी आदर्शवत ठरली आहे.

तिला सहानुभूती, भीक नको आहे, तर काम व त्या कामाचे सन्मानाने दाम व राहण्यासाठी निवारा हवा आहे, ऐवढीच तिची मायबाप सरकार कडून अपेक्षा आहे.

आपण नवरात्र उत्सवात ९ दिवस देवीचा भक्ती भावाने जागर करतो, पण या मानव रुपातील नवदुर्गेचा आपण सर्वांना मदतीरुपी जागर घातला तर तिची रेणू व युवराज यांचे भविष्य उज्वल झाले तर ख-या अर्थाने नवरात्र उत्सव साजरा केल्याचे पुण्य पदरात पडले, आणि तिच्या तुटलेल्या हाताना दहा हत्तीचे बळ मिळेल.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...