Thursday, 22 September 2022

हि-यांच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करुन मित्राकडे ऐंशी लाखाची खंडणी मागणाऱ्या तिघांना सहार मुंबई पोलिसांकडून अटक !

हि-यांच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करुन मित्राकडे ऐंशी लाखाची खंडणी मागणाऱ्या तिघांना सहार मुंबई पोलिसांकडून अटक !


मुंबई, (संजय कांबळे) : सुरत गुजरात येथील हि-याचे व्यापारी जयराम भाई वालजीभाई अंकोलीया यांनी सुमारे ३ कोटी, ५ लाख १९ हजार ९१२ रुपये किंमतीचे हिरे आपल्या दुबई येथील आँफिस मध्ये पोहचविण्यासाठी एका विश्वासातील व्यक्तीस सहार विमानतळ येथे दिले होते. यानंतर त्यांने त्याचे दोन साथीदार व एक महिला आरोपी यांनी कट करून संगणमत, करुन कस्टम आँफिसरची फिर्यादीस भिती घालून त्यांच्या मित्रास डांबून ठेऊन

जिवे ठार मारण्याची धमकी देऊन सुमारे ८० लाख रुपये खंडणी मागणाऱ्या तिघांना सहार मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई पोलीस दलातील कक्ष १२चे पोह अमोल राणे व पोना प्रसाद गोरुले यांना फिर्यादी जयरामभाई दिली. याचे गांभीर्य लक्षात घेऊन ही माहिती प्रपोनि भोसले, त्याप्रमाणे प्रोउआ ,प्र१ व सपोआ डि१ उत्तर यांच्या निर्देशानुसार कक्षश१२चे पोनि तेजनकर, सपोनि रासकर, पोह अमोल राणे, पोह अल्लाफ खान, पोना प्रसाद गोरुले, पोशि शिरसाट, पोशि जाधव, पोशि गोमे यांनी फिर्यादीचे सोबत लक्ष्मी पॅलेस लाँज पेनकर पाडा, काश्मिरा येथे छापा टाकून वय वर्षे २५, ३३ वर्षे, आणि वय २० वर्षे सुरत गुजरात यांना अटक केली. त्यांच्या कडून ३ कोटी, ५ लाख १९ हजार ९१२ रुपये किंमतीचे हिरे हस्तगत केले.

ही कामगिरी पोलीस सह आयुक्त (गुन्हे) सुहास वारके, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) एस विरेश प्रभू, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) संग्रामसिंह निशाणदार, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्र. उत्तर) काशीनाथ चव्हाण, यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक विलास भोसले, पोनि दिलीप तजनकर, सपोनि विजय रासकर, प्रकाश सांवत, पोउनि खानविलकर, राजेंद्र चव्हाण, सपोउनि मुरलीधर कारंडे, संतोष ब्रिद, पोह अल्लाफ खान, लक्ष्मण बागवे, कल्पेश सावंत, बाळकृष्ण लिमण, सुनील चव्हाण, संतोष राणे, संतोष बने, शैलेस बिचकर, अमोल राणे, पोना शैलेश सोनावणे, प्रसाद गोखले, पोशि विशाल गोमे, सचिन जाधव, शिरसाट, पोहाचा सांवत यांनी पार पाडली.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...