Thursday, 22 September 2022

मंडल अधिकारी पवार यांनी स्वतः शेतकऱ्यांसह केली ई पीक पहाणी !

मंडल अधिकारी पवार यांनी स्वतः शेतकऱ्यांसह केली ई पीक पहाणी !


कल्याण, नारायण सुरोशी : गावागावातले तलाठी पीकपाण्याची नोंद करण्यासाठीही पैसे घेतात म्हणून शेतकऱ्यांचा त्रास वाचविण्यासाठी राज्य शासनाने ई पीक पाहणीचे ॲप आणले. ही गोष्ट अत्यंत चांगली झाली आहे. हे ॲप आणून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृतीही केली. या पीक पाहणी ॲपमध्येच तुम्ही तुमची माहिती जमा करा, त्याखेरीज तुम्हाला पीकपेरा मिळणार नाही आणि पीककर्जासाठीही तुम्ही पात्र होणार नाही असे सांगितल्यानंतर शेतकरीही खडबडून जागे झाले आणि त्यांनी या ॲप ला डाऊनलोड, इन्स्टॉल करून शेतात जाऊन पीकांचे फोटो काढले आणि त्यात भरले.


पीक पाहणी पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या हातात आणून देऊन शासनाने मोठा दिलासा दिला आहे. पीक पाहणी केल्यानंतर ४८ तासांमध्ये त्याची नोंद तांत्रिकदृष्ट्या निश्चित होते. कल्याण तालुक्यातील म्हारळ येथील मंडल अधिकारी पवार यांनी मांजर्ली तील ४६ व दहागांवच्या १० खातेदाराची ई पीक पहाणी स्वतः जावून शेतकऱ्यांसह केली तसेच ३० सप्टेंबर पर्यंत अहवाल सादर करण्याची शेवटची तारीख असून शेतकऱ्यांनी लवकर पूर्ण करून शासन योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले.


No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...