Friday, 23 September 2022

नालासोपारा येथील महापालिकेच्या "सोपारा सामान्य रुग्णालयातील" आरोग्य सेवा वाऱ्यावर ! "रूग्णांची गैरसोय"

नालासोपारा येथील महापालिकेच्या "सोपारा सामान्य रुग्णालयातील" आरोग्य सेवा वाऱ्यावर ! "रूग्णांची गैरसोय" 

तातडीने रिक्त पदे व सोयी सुविधा उपलब्ध करण्याबाबत महिला संघर्ष समितीची आयुक्तांकडे मागणी.....


वसई, प्रतिनिधी : नालासोपारा (प) मधिल वसई विरार महापालिकेचे एकमेव सोपारा सामान्य रूग्णालय आहे. रुग्णालयावर करोडो रूपये खर्च करून सुसज्ज रूग्णालय महापालिकेने बांधले आहे कोणती हि सुविधा नसल्याने रूग्णालय हे रूग्णांसाठी शोभेची बाहुली ठरली आहे.

रूग्णालयात एम. आर. आय, सिटी स्कॅन, ईको  मशिन तपासणी करण्याची कोणती हि सोय नसल्याने रूग्णांना खाजगी तपासणी सेंटर मध्ये पाठवुन टक्केवारी घेण्याचे काम डॉक्टर करत आहेत.

सोपारा सामान्य रूग्णालयात रूग्णांना आत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी शासनाकडुन आदेश देण्यात आले आहेत. जेणे करून येथिल गोर- गरीब जनतेला उपचार घेण्यास मदत होईल. रूग्णालयात अनेक पदे रिक्त असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे.

मात्र असे असताना सदर रुग्णालयातील एम. आर. आय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी मशिन  सुरू करण्यास विलंब होत असल्यामुळे रूग्णांना खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. ज्या  रूग्णांना तात्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते अशा रूग्णांना नाईलाजाने खाजगी रूग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागत आहे. यामुळे रूग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

रुग्णालयातील, कर्मचारी व सुरक्षा रक्षकांकडून रूग्णांचा नातेवाईकांना अरेरावीची भाषा वापरून अपमानास्पद वागणूक दिली जाते.

रुग्णालयातील रूग्णांना उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करून तातडीने  रुग्णालयातील एम आर आय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी मशिन सुरू करण्याबाबत व तातडीने रूग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबत महिला संघर्ष समिती ने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन मागणी केली याबाबत तातडीने रिक्त पदे भरून मशिन बसवण्याचे आश्वासन देण्यात आले.

यावेळी *महिला संघर्ष समिती संस्थापक/ अध्यक्षा रिनाताई जाधव,* *सल्लागार संजयभाऊ गायकवाड,* *वसई तालुकाध्यक्षा रूचिता अमित नाईक,* *नालासोपारा शहर अध्यक्षा इंदिरा सतेज कुर्ले - भोईर,* *नालासोपारा शहर सचिव कृतिका पठारे - मोरे,* उपस्थित होते.....

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...