कल्याण पंचायत समितीच्या सभापती पदी म्हारळ गावच्या अस्मिता जाधव बिनविरोध, मागासवर्गीय महिलेला पहिल्यांदाच सभापती पदाचा मान !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण पंचायत समितीच्या आज झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत तालुक्यातील म्हारळ गावाच्या श्रीमती अस्मिता अजय जाधव यांची बिनविरोध निवड झाली. एका मागासवर्गीय महिलेला कल्याण पंचायत समितीच्या सभापती पदाचा मान मिळाल्याची बहुधा ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जाते,दुसरा कोणाचाही उमेवारी अर्ज न आल्याने अस्मिता जाधव या बिनविरोध निवडून आल्याचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी घोषित केले.
कल्याण पंचायत समितीच्या सभापती पदाचा कार्यभार साधारण पणे सन १९६२ पासून सुरू झाला.आपटी गावच्या श्रीमती शुभांगी अनंत शिसवे या १९९७ मध्ये सभापती पदी विराजमान झाल्या. यानंतर अरुणा वाढेकर या २००० ते २००६ माधुरी वाळिंबे २००७/८, मिनाक्षी जाधव २००८/९, यांनतर जाईभाई पाटील, २०१२/१३, कल्पना रतन पाटील २०१३/१४ यानंतर मात्र तब्बल चार वर्षे कल्याण पंचायत समितीवर प्रशासक होते.
यावेळी निवडणूका झाल्या व पुन्हा दर्शना जाधव, या सभापती पदी विराजमान झाल्या, कल्याण पंचायत समितीचे सभापती पद हे महिलासाठी राखीव असल्याने भारती टेंभे, रंजना केतन देशमुख, अनिता वाघचौरे, आणि रेश्मा भोईर आदींनी मार्च २०२२ पर्यंत सभापती म्हणून कारभार केला, शेवटच्या काही महिन्यांकरिता पचायत समिती सदस्या मध्ये ठरलेल्या चर्चेनुसार रेश्मा भोईर यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे शेवटी अस्मिता जाधव याच राहिल्या होत्या,
आजच्या या सभापती पदाच्या निवडणुकीत कोणी इतर सदस्यांनी उमेदवारी अर्ज न सादर केल्याने व सदस्यां अस्मिता जाधव यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिका-या सभापती पदी अस्मिता अजय जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
आतापर्यंत कल्याण पंचायत समितीचे ३६ सभापती झाले यामध्ये मागासवर्गीय सभापती अद्याप पर्यंत झाले नव्हते, हा मान म्हारळ गावच्या अस्मिता जाधव यांना मिळाला आहे, हे सर्व कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या मुळे शक्य झाले असे सौ जाधव यांनी सांगितले.
यावेळी उल्हासनगर चे आमदार कुमार आयलानी, न्यास चे अध्यक्ष सोन्या पाटील, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, निवासी नायबतहसीलदार संजय भालेराव, उपसभापती भरत गोंधळे, सदस्य रमेश बांगर, पांडुरंग म्हात्रे, यशवंत दळवी, सदस्यां रंजना देशमुख, दर्शना जाधव, भारती टेंभे,अनिता वाघचौरे, म्हारळ ग्रामपंचायतीचे आजी माझी सरपंच, सदस्य, शिवसेनेचे कल्याण तालुका प्रमुख विश्वनाथ जाधव, तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, झेडपी सदस्य, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभापती पदी निवड होताच पहिल्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.







No comments:
Post a Comment