दसरा मेळाव्याचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने, परंपरेला गालबोट लागेल असे कृत्य " न " करण्याचे आवाहन !
भिवंडी, दिं,२३, अरुण पाटील (कोपर )
शिवसेनेच्या दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असे उद्धव ठाकरे यांनी अगोदरच घोषित केले होते. मात्र मेळाव्याला न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा मार्ग सुखकर झाला आहे. या निकालानंतर श्री. ठाकरे यांनी न्यायालयाचे आभार मानत पत्रकार परिषद घेतली. न्यायव्यवस्थेवरचा विश्वास आज सार्थ ठरला, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावार येताना वाजत, गाजत आणि गुलाल उधळत या. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था शिवसेनेच्या परंपरेचा गालबोट लागणार नाही, याची खबरदारी घ्या असे आवाहन ठाकरे यांनी शिव सैनिकांना केले आहे.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याच्या अर्जाला मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली. शिवसेनेने यानंतर न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीं धनुका यांच्या खंडपीठा समोर आज सुनावणी झाली. न्यायलायने शिवसेनेला शिवाजी पार्कावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. तसेच मुंबई महापालिका आणि बंडखोर आमदार सदा सरवणकर यांच्यावर ताशेरे ओढले.
शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्याची १९६६ साला पासूनची परंपरा आहे. आजच्या निकालाने न्याय व्यवस्थेवरील विश्वास सार्थ ठरवला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर येणाऱ्या शिवसेना प्रेमींनो वाजत गाजत, गुलाल उधळत आणि शिस्तीने या. शिवसेनेच्या तेजाला, वारसाला आणि परंपरेला गालबोल लागेल, असे कृत्य करु नका. इतर काय करतील, याबाबत नेम नाही. मात्र, आपली परंपरा जपा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.
तसेच आजच्या निकालाकडे संपूर्ण जगातील बांधवांचे लक्ष लागले होते. कोरोना काळ वगळला तर शिवसेनेचा मेळावा कधीही चुकला नाही. आजच्या निकालाने न्याय देवतेचा निकाल सार्थ ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयातही लोकशाहीच्या भवितव्याचा निर्णय होईल, असे ठाकरेंनी स्पष्ट केले शिवसेनेत दोन गट तयार झाल्याच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी शिवसेना आहे तशीच आहे, उलट शिवसेना वाढल्याचे सांगत शिंदे गटाला फटकारले. तसेच कायदा आणि सुव्यवस्था न्यायालयाने सरकारवर टाकली आहे. आम्ही शिस्तीने येऊ, कायदा सुव्यवस्था जपण्याचे काम सरकारने करावे असे सांगितले.
दसरा मेळावा निमित्ताने ठाकरे गटाचा पहिला विजय- शिवसेना कुणाची खरी हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या लढाईत दसरा मेळावा निमित्ताने ठाकरे गटाचा पहिला विजय झाला आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असल्याने यावर्षी होणारा दसरा मेळावा मोठ्या प्रमाणात शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. २१ सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या घेतलेल्या मेळाव्यामध्ये केंद्रीय भाजप नेतृत्वासह स्थानिक नेतृत्वावर कडाडून टीका केली होती.


No comments:
Post a Comment