भिवंडी, दिं,२३, अरुण पाटील (कोपर )
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गोरेगावच्या सभेची चिरफाड करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आक्रमक अंदाजात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संपूर्ण पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका केली. उद्धव ठाकरेंवर प्रहार करताना त्यांना महाराष्ट्रात फिरु न देण्याची धमकीही दिली. यावेळी 'उद्धवजी ठाकरे' म्हणत पत्रकाराने राणेंना प्रश्न विचारला. तर कोण उद्धवजी...? कोण उद्धव ठाकरे...? उद्धवss... असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना एकेरी नावाने उल्लेख करत पत्रकारांशी हुज्जत घातली.
मुंबईचे लचके तोडण्यासाठी काही गिधाडं मुंबईवर घिरट्या घालत आहेत. पण मुंबईचा आणि कमळाबाईचा संबंध काय? असा थेट सवाल करत हिंदू मुस्लिम भेद करुन दाखवा, मुस्लिम शिवसेनेसोबत आहे, मराठी- अमराठी भेद करा, अमराठी बांधव आमच्यासोबत आहेत, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी काल गोरेगावच्या नेस्को मैदानावरुन भाजपला ललकारलं. तसेच गटप्रमुखांच्या मेळाव्यातूनच दसरा मेळाव्या आधीच 'ट्रेलर' दाखवून मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंगही फुंकलं. उद्धव ठाकरे यांच्या याच भाषणाची चिरफाड करण्यासाठी नारायण राणे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणे चांगलेच आक्रमक झाले होते.
जवळपास अर्धा तास चाललेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. अगदी पहिल्या मिनिटापासून पत्रकार परिषदेच्या शेवटच्या मिनिटापर्यंत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका केली पण ही टीका करताना त्यांनी पातळी सोडली होती. उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंब संपल्यात जमा आहे, जे संपलेत त्यांना काय संपवणार? असं सांगत राऊतांनंतर जेलमध्ये जाण्याचा त्यांचा नंबर आहे, असं राणे म्हणाले. राणेंच्या निवेदनानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. एका पत्रकाराने 'उद्धवजी' असं म्हणताच.. कोण उद्धवजी... कोण उद्धव ठाकरे? उद्धव.ss...., असं राणे म्हणाले. त्यावर तुम्ही बोलू शकतात, आम्ही नाही... असं पत्रकार म्हणताच नाय नाय.. उद्धव बोललात तुम्ही, असं हसत हसत राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी काल नैराश्यातून भाषण केलं. उद्धव ठाकरे यांचं शिवसेना वाढीसाठी योगदान काय? निष्ठावंतांच्या रक्तावर शिवसेना वाढली. उद्धव ठाकरे केवळ आयत्या बिळावर नागोबा आहेत. उद्धव ठाकरेंनी किती मराठी माणसांना घरं दिली, नोकऱ्या दिल्या? उद्धव ठाकरेंनी जास्त बोलू नये. त्यांना तोंड बंद करु. संजय राऊत यांच्यासारखं उद्धव ठाकरेही जेलमध्ये जातील. आमचा कोथळा काढण्याची भाषा करताय, आमच्याकडे बघितले तरी आम्ही डोळे काढू, अशी धमकीच नारायण राणेंनी ठाकरेंना दिली.
राणे म्हणाले, अमित शाह मुंबईत आले तर मुंबईवर चालून आले म्हणता. मुंबई काय तुमची आहे का? मुंबईवर संकट येते तेव्हा केंद्र सरकार नेहमी महाराष्ट्राला मदत करते. अशी एकही नैसर्गिक आपत्ती नाही ज्या आपत्तीला केंद्राहून मदत येत नाही. उद्धव ठाकरे तुम्ही मातृभूमीसाठी काय केलं? मुंबईकरांसाठी काय केलं? मला भाजपात घेऊ नये म्हणून तुम्ही अमित शाह यांना फोन केले तेच अमित शाह मुंबईत आले तर त्यांना गिधाडं म्हणता.. चांगलं बोलता येत नाही काय?, अशा शब्दात अमित शाह यांच्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना राणेंनी उत्तर दिलं.
उद्धव ठाकरे यांनी काल गोरेगावच्या नेस्को मैदानावरुन भाजपला ललकारलं. तसेच गटप्रमुखांच्या मेळाव्यातूनच दसरा मेळाव्याआधीचा ट्रेलर दाखवून मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंगही फुंकलं. उद्धव ठाकरे यांच्या याच भाषणाची चिरफाड करण्यासाठी नारायण राणे यांनी राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी नारायण राणे चांगलेच आक्रमक झाले होते.
उद्धव ठाकरे म्हणजे आयत्या बिळावरचा नागोबा आहे. एक नंबरचा लबाड लांडगा, सगळं काही स्वर्थासाठी करतो. त्याचं शिवसेना पक्षवाढीसाठी योगदान काय? फक्त भाषणं करुन टोमणे मारायचे, एवढंच त्याचं काम. उद्धव ठाकरेंचं कुटुंब संपलंच आहे, त्यांना संपविण्याची कुणाला गरज नाही. संपलेल्यांना काय संपवणार...? प्रत्येक भाषणात मर्द शब्दाचा उल्लेख.. अरे किती वेळा मर्द आहे सांगतो, तुला तपासावं लागेल, आयुष्यात मर्दासारखं एक काम केलं नाही. सगळी कामं दुसऱ्यांकडून करून घेतली, अशा आक्षेपार्ह शब्दात अख्ख्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गोरेगावच्या नेस्को मैदानावर मुंबईतील गटप्रमुखांना संबोधित केलं. विराट मेळाव्यात त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर कडाडून हल्ला चढवला तर राज ठाकरे यांचा उल्लेख पुन्हा 'मुन्नाभाई' करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. मुंबईचे लचके तोडण्यासाठी काही गिधाडं मुंबईवर घिरट्या घालत आहेत. पण मुंबईचा आणि कमळाबाईचा संबंध काय? असा थेट सवाल करत हिंदू मुस्लिम भेद करुन दाखवा, मुस्लिम शिवसेनेसोबत आहे, मराठी-अमराठी भेद करा, अमराठी बांधव आमच्यासोबत आहेत, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी काल गोरेगावच्या नेस्को मैदानावरुन भाजपला ललकारलं. तसेच गटप्रमुखांच्या मेळाव्यातूनच दसरा मेळाव्याआधीचा 'ट्रेलर' दाखवून मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंगही फुंकलं. उद्धव ठाकरे यांच्या याच भाषणाची चिरफाड करण्यासाठी नारायण राणे यांनी राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणे चांगलेच आक्रमक झाले होते.
नैराश्यातून उद्धव ठाकरे यांनी काल भाषण केलं. उद्धव ठाकरे यांचं शिवसेना वाढीसाठी योगदान काय? निष्ठावंतांच्या रक्तावर शिवसेना वाढली. उद्धव ठाकरे केवळ आयत्या बिळावर नागोबा आहेत. उद्धव ठाकरेंनी किती मराठी माणसांना घरं दिली, नोकऱ्या दिल्या? उद्धव ठाकरेंनी जास्त बोलू नये. त्यांना तोंड बंद करु. संजय राऊत यांच्यासारखं उद्धव ठाकरेही जेलमध्ये जातील. आमचा कोथळा काढण्याची भाषा करताय, आमच्याकडे बघितले तरी आम्ही डोळे काढू", अशी धमकीच नारायण राणेंनी ठाकरेंना दिली. तसेच अमित शहांना गिधाड म्हणता. चांगले शब्द नाहीत का? औकात आहे का तुझी? अशी टीका करताना राणेंनी पातळी सोडली.
मर्द असाल आणि हिम्मत असेल तर मुंबई पालिकेची निवडणूक महिनाभरात घेऊन दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी काल गोरेगावच्या नेस्को मैदानातील सभेत बोलताना भाजपला दिलं. त्यांच्या याच आव्हानाची राणेंनी खिल्ली उडवली. "तुझा अभ्यास वगैरे काही आहे की नाही? हे सगळे निर्णय एखादा पक्ष घेत नाही, असे निर्णय संबंधित परिस्थिती पाहून निवडणूक आयोग घेतो. ढ विद्यार्थी कुठचा..." अशा शब्दात राणेंनी ठाकरेंना डिवचलं.
सेच भाजपवर शरसंधान साधणाऱ्या ठाकरेंना नारायण राणेंनी इशारा दिला. "मोदींच्या कामासमोर उद्धव ठाकरे नखाएवढाही नाही. तो काय त्यांच्या कामावर बोलतो. उद्धव ठाकरे संपल्यात जमा आहे. जास्त बोलाल तर तोंड बंद करेन. महाराष्ट्रातही फिरु देणार नाही", अशी धमकीच राणेंनी उद्धव ठाकरेंना दिली.

No comments:
Post a Comment