भिवंडी, दिं,२२, अरुण पाटील (कोपर)
ठाणे जिल्ह्यातील उल्हास नगर येथील एका इमारतीचा स्लॅब कोसळून चौघानंचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून यात आणखीन ४-५ जण अटकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
सविस्तर हकीगत अशी की,उल्हासनगर कॅम्प नंबर ५ भागात मानस टॉवर नावाने पाच मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये एकूण ३० फ्लॅट असून ही इमारत ३० वर्षापूर्वी उभारण्यात आली होती. तर उल्हासनगर महापालिकेनं या इमारतीच्या रहिवाशांना दोन वेळा इमारत धोकादायक असल्याने नोटिसा बजावण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर ढिगाऱ्या खाली आणखीन ४ ते ५ रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
घटनास्थळी महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफची टीम दाखल झाली असून बचाव कार्य सुरू केले आहे.उल्हासनगर कॅम्प नंबर ५ भागात असलेली मानस टॉवर या ५ मजली ईमारतीच्या 4 मजल्यावरील एका रूमचा स्लॅब कोसळून तो तळमजल्यापर्यत एकावर एकवर खाली कोसळत गेल्याने दुर्घटना घडली आहे.
या दुर्घटनेत आतापर्यत ४ रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. सागर ओचानी (१९), रेणू धनवानी (५५) धोलानदास धनवानी (५८) आणि प्रिया धनवानी (२४) अशी मृतांची नावे असून यामध्ये धनवानी कुटुंबातील तिघांचा समावेश असून पती पत्नी आणि मुलीचा समावेश आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर ५ भागात मानस टॉवर नावाने पाच मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये एकूण ३० फ्लॅट असून ही इमारत २५ वर्षापूर्वी उभारण्यात आली होती. तर उल्हासनगर महापालिकेनं या इमारतीच्या रहिवाशांना दोन वेळा इमारत धोकादायक असल्याने नोटिसा बजावण्यात आल्याचे पालिका आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पालिका प्रशासनाने यापूर्वीच ही इमारत धोकादायक असल्याचे जाहीर केले होते.
त्यामुळे या इमारतीतील बहुतांश रहिवाशी राहत नव्हते. मात्र काही रहिवाशी जीव मुठीत घेऊन लपून छपून राहत असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.ढिगाऱ्या खालून ६ जणांना बाहेर काढण्यात यश सकाळी साडे अकरा वाजल्याच्या सुमारास चौथ्या मजल्यावरील एका खोलीचा स्लॅब कोसळून तो तळ मजल्यावर असलेल्या दुकानावर पडला होता. त्यावेळी ढिगाऱ्या खाली ७ ते ८ रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफची टीम दाखल होऊन बचाव कार्य सुरू केले होते. दुपारी साडेचार वाजेपर्यत ढिगाऱ्या खालून ५ ते ६ जणांना बाहेर काढण्यात आले. यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पालिका प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उल्हासनगर महापालिका हद्दीत महिनाभरात स्लॅब कोसळण्याच्या तीन घटना घडल्या असून यात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात एक मजूर तर तीन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेत एका वृद्धाचा समावेश आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर पालिकेच्या वतीने याही इमारतीला देण्यात आलेली नोटीस प्रसिद्ध करण्यात आली.
या घटनेमुळे पालिका प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.घटनास्थळी शिंदे गटातील आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी धाव घेऊन पाहणी केली. मात्र गेल्या ५ वर्षापासून शासन व सत्ताधाऱ्यांनी धोकादायक इमारतीमधील रहिवाशा संदर्भात ठोस निर्णय घेत नसल्याने हजारो कुटूंब आजही धोकादायक इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
आता तरी तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने निर्णय घेऊन लोकांचे जीव वाचविण्याची गरज असल्याची चर्चा शहरातील नागरिक करत आहेत.

No comments:
Post a Comment