"दत्ता बरोरा यांची आदिवासी आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड"
शहापूर -(एस. एल. गुडेकर) :
शहापूर तालुक्यातील 79 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत असून आज शहापूर तालुका काँग्रेस तर्फे निवडणूक मार्गदर्शन बैठक देशमुख वाडा शहापूर येथे ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीचे प्रास्तविक तालुका अध्यक्ष महेश धानके यांनी करून जास्तीत जास्त काँग्रेसचे सरपंच व सदस्य निवडणूक आणण्याचे आवाहन केले. यावेळी निवडणूक नियोजनासाठी निरीक्षक म्हणून असिफ शेख (खर्डी), संजय तांबोळी (चेरपोली, बिरवाडी), महेंद्र आरज (डोळखांब), दत्ता बरोरा (अघई), रामचंद्र जोशी, नौशाद शेख (वासिंद), दशरथ भोईर, अंकुश भोईर (कसारा), मल्हारी कोळेकर (नडगाव) यांची निवड करण्यात आली. याच बैठकीत ठाणे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी ठाणे जिल्हा ग्रामीण आदिवासी आघाडी अध्यक्षपदी शहापूरचे माजी आमदार कै. म. ना. बरोरा यांचे ज्येष्ठ पुत्र दत्तात्रय महादू बरोरा यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष महेश धानके, जिल्हा उपाध्यक्ष आबा देशमुख, लक्ष्मण घरत, कल्याण तालुकाध्यक्ष सोमनाथ मिरकुटे, युवक अध्यक्ष अंकुश भोईर, शहापूर शहर अध्यक्ष संजय तांबोळी, शिवराम मोगरे, कांता तारमळे, शिवराम मोगरे, दशरथ भोईर, संतोष पांढरे, शांताराम धामणे, अब्दुल शेख, माया मगर, झिपा वीर, संतोष मुकणे, यशवंत विशे, जयवंत पाटेकर, मंजुळा कलचिडा आदिसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:
Post a Comment