Friday, 23 September 2022

ओबीसी जनगननेला विरोध कोणाचा?.. प्रा. श्रावण देवरे

ओबीसी जनगननेला विरोध कोणाचा?.. प्रा. श्रावण देवरे


चोपडा, बातमीदार ..या देशात पशुपक्षी सह सर्वांच्या गणना झालेले आहेत. एवढेच काय ब्रिटिशांच्या काळात कोणती लोकसंख्या किती किती प्रमाणात याची इत्थंभुत माहिती जनगणना करून नोंद केलेली असे. पण गेल्या ७०/७५ वर्षात.. या देशात पशुपक्षी सह सर्वांच्या गणना झालेल्या आहेत. पण ओबीसींचीच जनगणना झालेली नाही हा अन्याय आहे. 


कारण ओबीसी एक संघ झाला तर सत्ताधारी बनू शकतो. तसे वर्चस्व वाढू न इच्छीणारे लोकच या जनगणना विरोधी आहेत कारण लोकसभा, राज्यसभा, महामहीम, राष्ट्रपती या सर्वांनी जनगणनेचे ठराव केलेले आहेत. तरीही जनगणना होत नाही कारण त्यांना भीती आहे की ओबीसी जागा झाला तर बिहार, तामिळनाडू सारखे ओबीसीचे वर्चस्व निर्माण करतील अशी त्यांना भीती आहे. 


ओबीसींच्या कष्टातून निर्माण संपत्तीचा व संकलित जीएसटी चा मोठा वाटा प्रस्थापित लोकांसाठी वापरला जात आहे, आर्थिक घोटाळे करून पळून त्यात परदेशात जाणारे .उद्योग सहकार क्षेत्रात कर्जमाफी मिळवणारे लोकांचा मोठा समावेश आहे, ओबीसींची, जनगणना झाली तर त्याची टक्केवारी निश्चितच ६० टक्के आहे असे निष्पन्न होईल आणि तेव्हढी जनसंख्ययेला अर्थव्यवस्थेतून वाटा मिळेल, त्यांना त्यांच्या विकासासाठी द्यावी लागेल म्हणून जनगणना होऊ देत नाहीत. असे प्रतिपादन ओबीसी राजकीय आघाडीचे प्रमुख प्रा. श्रावण देवरे, धुळे यांनी चोपडा माळी समाज मंगल कार्यालयात ओबीसी हक्क समिती तर्फे आयोजित व्याखानात केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री दिगंबर महाजन होते. कार्यक्रमाचे निमंत्रक भा क प नेते, कॉम्रेड महाजन म्हणाले की म्हणाले की मंडल आयोगाच्या शिफारसी नोकरी संदर्भात लागू झाल्या पण जे रोजगार व्यवसायाविना खऱ्या अर्थाने मागासवर्गीय आहेत त्यांना देखील मंडल आयोगाने अर्थसहाय्य शैक्षणिक सवलती देण्याच्या शिफारसी केलेल्या आहेत. 


हे शहीद गोविंद पानसरे यांनी *अमलात न आलेला मंडल आयोग* पुस्तिका लिहून निदर्शनास आणून दिले आहे. तेव्हा उठ, ओबीसी जागा हो !! फुले शाहू आंबेडकर विचारांचा धागा हो !!. असे आवाहन त्यांनी आपल्या भाषनात केले. या कार्य क्रमात आयु गोपाळराव सोनवणे, सावता माळी युवक संघाचे अध्यक्ष जितेंद्र महाजन यांनीही आपले विचार मांडले, माळी समाज सुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष पुंडलिक महाराज यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास शोभाताई देवरे धुळे, गुलाबराव पगारे ,ए के गंभीर सर, समाधान सर, माळी सर, यांचेसह ५० नागरिक उपस्थित होते. त्यावेळी प्रा  देवरे यांच्या ओबीसी विषयावरील पुस्तक विक्रीला प्रतिसाद मिळाला.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...