औरंगाबाद (सिल्लोड), अखलाख देशमुख, दि २५ : कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या निर्देशानुसार नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील दुर्गामाता मंदिर येथे भाविक भक्तांच्या सोयीसाठी नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता व विविध उपाययोजना करण्यात आल्या. नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम तसेच उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी शहरातील दुर्गामाता संस्थान येथे भेट देऊन करण्यात आलेल्या उपाययोजनेचा आढावा घेतला.
नवरात्र उत्सव निमित्त दुर्गामाता मंदिर येथे भाविकांची होणारी वर्दळ पाहता या भागात प्रखर विद्युत रोषणाई, रस्त्या लगत प्रत्येक खांबावर लाईट, स्वच्छता, मंदिर परिसरात वाहनांसाठी पार्किंग , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी सुविधा व उपाययोजना नगर परिषदेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी या उपाययोजनेचा आढावा घेवून भाविक भक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होवु नये यासाठी नगर परिषद, वीज वितरण विभाग आदी शासकीय यंत्रणेने सज्ज रहावे अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
----------------------------------------- ----
दुर्गा माता मंदिराकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्या
दुर्गामाता मंदिराकडे जाण्यासाठी श्री म्हसोबा महाराज मंदिर पाठीमागून रस्ता असून नगर परिषदेच्या माध्यमातून या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आलेले आहेत. तसेच दुसरा पर्यायी रस्ता श्री महादेव मंदिर पाठीमागून असून या रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने हा रस्ता ही चकाचक करण्यात आलेला आहे. हा रस्ता पुढे गणपती मंदिर व खोडकाई वाडी कडे जातो. नवरात्र काळात वाहनांची कोंडी होवू नये यासाठी वाहन धारकांनी या दोन्ही रस्त्याचा वापर करावा असे आवाहन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, पीएसआय श्री. झिंझुर्डे, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, दुर्गामाता संस्थांन चे अध्यक्ष राजू बन्सोड, तलाठी काशिनाथ ताठे, संजय मुरकुटे, गौरव सहारे, जगन्नाथ कुदळ, फहिम पठाण, प्रवीण मिरकर, गणेश सयाजी वाघ, शिवा टोम्पे, विशाल खैरे, आनंद सिरसाट, गोपी वाघ, अजय वाघ, कृष्णा चव्हाण, विशाल पवार, दीपक गायकवाड, मॉन्टी साळुंके आदींची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment