Sunday, 25 September 2022

*भाविकांनी भक्ती भावाने मातेच्या दर्शनासाठी येण्याचे संस्थापक अध्यक्ष, 'विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे' यांचे आव्हान !

*भाविकांनी भक्ती भावाने मातेच्या दर्शनासाठी येण्याचे संस्थापक अध्यक्ष, 'विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे' यांचे आव्हान !


औरंगाबाद, दि. २५, अखलाख देशमुख : दरवर्षी नवरात्र उत्सवात कर्णपुरा या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते, दोन वर्ष कोरोनामुळे उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता, परंतु आता कोरोनाची संख्या कमी झाल्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात, जोमाने कर्णपुरा यात्रा भरणार आहे असे कर्णपुरा नवरात्र उत्सव महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
 नवरात्र उत्सवात नित्यनियमाने दररोज सकाळी व संध्याकाळी ७:०० वाजता देवीची आरती करण्यात येते,मागील दोन वर्ष भक्तांना देवीचे दर्शन घेता आले नाही त्यामुळे यावर्षी प्रचंड गर्दी राहणार आहे याची दक्षता घेऊन विशेष नियोजन करण्यात आले आहे. कर्णपुरा माता मंदिरात विद्युत रोषणाई, हार, फुले पताकाने सजवण्यात आले आहे, मंदिर परिसरात पोलीस सुरक्षा यंत्रणा असणार आहे, भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ठिकठिकाणी आरोग्य पथक असणार आहे, ॲम्बुलन्स ,अग्निशमन यंत्रणा असणार आहे, ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साफसफाई, स्वच्छता याची विशेष काळजी घेतली जाणार आहे, चार चाकी, दुचाकी वाहन पार्किंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती दानवे यांनी दिली तसेच दोन वर्षाच्या कालखंडानंतर भाविकांना मातेच्या दर्शनाची ओढ लागली आहे भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने दर्शनासाठी यावे असे आव्हान संस्थापक अध्यक्ष दानवे यांनी केले.

No comments:

Post a Comment

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा !

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा ! पुणे, प्रतिनिधी : आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आ...