पालघर : दि.२५ (प्रतिनिधी) संपूर्णत: जाहिरातमुक्त आणि निशुल्क म्हणून ख्यातकीर्त असलेल्या मराठी भाषेतील एकमेव डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा कैवारीचा तृतीय वर्धापन दिन रायगड जिल्ह्यातील विचुंबे येथील डी. डी. विसपुते महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दैनिक रयतेचा कैवारीचे पालघर जिल्हा प्रतिनिधी तथा रयतेचा कैवारी दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक किरण गायकर यांना यांना यावेळी 'विशेष सेवा गौरव' पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्याच्या शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा अवीट ठसा उमटविणार्या सुमारे ९५ मान्यवरांचा गौरवही यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला राज्याच्या सर्व जिल्ह्यातील रयतेचा कैवारीचे प्रतिनिधी, पुरस्कारार्थी आणि आप्तेष्ट यांची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सुप्रसिद्ध गायक पोकळे सर आणि त्यांच्या साथीदारांनी सुमधुर ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्वागताध्यक्षा मनिषा पवनारकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
सुमारे चार तास चाललेल्या या भव्य-दिव्य कार्यक्रमाला आदर्श शैक्षणिक समूहाचे संस्थापक दादासाहेब धनराज विसपुते हे अध्यक्ष म्हणून लाभले. उपसंचालक तथा मुंबई विभाग आरएए प्रमुख श्रीम. मनिषा पवार, कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालय तलासरीचे प्राचार्य डॉ. भगवानसिंग राजपूत, कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सह संयोजक अनिल बोरनारे, को.म.सा.प. रायगडचे अध्यक्ष सुधीर शेठ, रयतेचा कैवारीचे संपादक शाहू संभाजी भारती, उपसंपादक संजय येशी, साप्ताहिक रयतेचा कैवारीचे कार्यकारी संपादक प्रतापराव शिंदे, पाक्षिक रयतेचा कैवारीच्या कार्यकारी संपादिका सुनिता इंगळे-सूर्यवंशी, मासिक रयतेचा कैवारीचे कार्यकारी संपादक मिठ्ठू आंधळे आदी मान्यवर प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते. सर्व मान्यवर अतिथींनी आपल्या मनोगतातून सर्व पुरस्कारार्थिंचे अभिनंदन करून रयतेचा कैवारी परिवाराचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन आणि आयोजन रायगड जिल्ह्यातील प्रतिनिधींनी केले. रायगड जिल्हा प्रतिनिधी शंकर शिंदे, मनिषा पवनारकर, सुनील घोलप, तालुका प्रतिनिधी बालाजी गुबनारे, बागूल, बांदल आदी सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख लिंबराज गीते यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील घोलप यांनी केले.

No comments:
Post a Comment