Sunday, 25 September 2022

राज ठाकरे पी एफ आय विरोधात कडाडले : "ही थेरं आमच्या देशात चालणार नाहीत, त्यांना अद्दल घडवा"

राज ठाकरे पी एफ आय विरोधात कडाडले : "ही थेरं आमच्या देशात चालणार नाहीत, त्यांना अद्दल घडवा"


कारवाई होणार --एकनाथ शिंदे.
शोधून काढू, सोडणार नाही --फडणवीस.



भिवंडी, दिं,२४, अरुण पाटील (कोपर )
          'पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर, या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाही. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्ट करा, यातच हिंदुस्थानाचे हित आहे, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती, त्यावेळी पाकिस्तान बाबत घोषणाबाजी करणाऱ्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिले, तर गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शोधून काढू, सोडणार नाही असे ठणकावले.
          एनआयए'ने छापे टाकून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली. त्याविरोधात पुण्यात या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, 'पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर' अशा घोषणा दिल्या. सरकारने यांना वेळीच ठेचले पाहिजे. अशाप्रकारची झणझणीत टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.
          पीएफआय'विरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल आंदोलन करण्यात आले. मात्र, हे आंदोलन सुरू होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप होतोय. मात्र, पुणे पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
          राज ठाकरेंनी एक पत्र पोस्ट करत याबाबत आपला निषेध व्यक्त केला. ठाकरे म्हणाले, अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, या गंभीर आरोपांखाली. थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही या देशद्रोह्यांचे समर्थन करत जर या पीएफआय कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत. असा सणसणीत इशारा ठाकरेंनी दिला.
            पुढे राज ठाकरे म्हणाले, माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, फक्त या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील "पा" उच्चारता येणार नाही. नाहीतर आता या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर यांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल याचे त्यांनी भान ठेवावे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...