Wednesday, 14 September 2022

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर रेल्वे पोलीसांनी पुन्हा प्रवाशाला लुटले, काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकांनी अनेकांना केले होते निलंबित !

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर रेल्वे पोलीसांनी पुन्हा प्रवाशाला लुटले, काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकांनी अनेकांना केले होते निलंबित !


ठाणे, (प्रतिनिधी) : कोणार्क एक्सप्रेस या गाडीने भुवनेश्वर (ओडिशा) येथे जाणाऱ्या एका रेल्वे प्रवाशाला बँग चेकिंग च्या नावाखाली ५-६ रेल्वे पोलिसांनी लुटले असल्याचे खात्रीलायक वृत्त असून त्याने या भ्रष्ट पोलीसांच्या विरोधात रेल्वे हेल्पलाईन नंबर वर तक्रार दाखल केली आहे. विशेष बाब म्हणजे या अगोदर प्रवासी व व्यापारी यांची अशीच लुट करणाऱ्या ८ ते १० पोलीसांना डॉ. प्रज्ञा सरवदे, लोहमार्ग अतिरिक्त पोलीस महासंचालक, मुंबई यांनी निलंबित केले होते. तरी देखील अद्यापही सर्वच टर्मिनस वर बँग तपासणी च्या 'गोडस'नावाखाली बिनधास्त पणे वसुली सुरू असल्याचे सुत्रांकडून समजते.


१२ सप्टेंबर रोजी एक प्रवासी गाडी नंबर ११०९ कोणार्क एक्सप्रेस ने भुवनेश्वर (ओडिशा) येथे जाण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॉट क्रमांक १७ वर आला असता तेथील ५-६ रेल्वे पोलिसांनी त्याची बँग चेक केली, त्यामध्ये एक छोटा पँक क्वार्टर होती, लगेचच पोलिसांनी कायद्याच्या बाराखडी सांगून हे कसे बेकायदेशीर आहे याचा पाढाच वाचला, प्रवासी घाबरला, यातून सुटायचे असेल तर पैसे द्यावे लागतील असे सांगून त्यांच्याकडून २ हजार रुपये वसूल केले, गाडी चुकू नये म्हणून तो गाडीत बसून निघून गेला.


या दरम्यान प्रवासात आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यांने हा प्रकार त्याचा सहप्रवासी सुनील बागूल यांना सांगितला,त्यांनी ताबडतोब १५१२ या रेल्वे हेल्पलाईन नंबर वर तक्रार केली, यावर तक्रार नोंद करणारे ठाणे अंमलदार यांनी तूम्ही तक्रार द्यायला या असे सांगताच मी सध्या भुवनेश्वर (ओडिशा) येथे चाललोय, एक महिन्यानंतर येणार असे सांगितले.

हा प्रकार ४:३५ वाजता घडला. या ५ ते ६ वसुली पोलीसा मध्ये जाधव, पवार, नाईक आणि भंडलकर याचा समावेश असल्याचे सुत्रांकडून समजते.

काही दिवसांपूर्वी मुंबई एस एमटी, मुंबई सेंट्रल, या टर्मिनस वर व्यापारी व प्रवासी यांच्या कडून बँग चेकिंग च्या नावाखाली हजारो रुपये, तसेच काही ग्रुँम सोने वसुली पोलिसांनी लुटले होते, यावेळी तक्रार होताच डॉ  प्रज्ञा सरवदे, लोहमार्ग अतिरिक्त पोलीस महासंचालक यांनी ८ ते १० पोलिसांना निंलबीत केले होते. यामध्ये यांच्या वर थातुरमातुर कारवाई करून पुन्हा यांनी ८ ते १० दिवसात सेवेत रुजू करून घेतले. यातील एकाला तर केवळ ४ दिवसात पुन्हा पालघर येथेच घेतले त्यामुळे हे कारवाई चे "नाटक" कशासाठी असा प्रश्न निर्माण होतो.

लोहमार्ग पोलिसांचे हे वाढते प्रकार पाहून पोलीस महासंचालकांनी बँग चेकिंग ही वरीष्ठ अधिका-या समक्ष करावी असे आदेश दिले होते. परंतु कुठेही याची अमंलबजावणी होताना दिसत नाही. उलट आजही मुंबई सीएसटी, मुंबई सेंट्रल, कुर्ला टर्मिनस, ब्रांदा, दादर, कल्याण, आदी स्टेशन वर बिनधास्त वसुली सुरू आहे.

ही वसुली कुठें पर्यंत पोहचली आहे, याचा अंदाज येतो. या संदर्भात लोहमार्ग चे डिसीपी मनोज पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगितले. तर हे वाढते प्रकार रोखण्यासाठी आपण लवकरच डॉ. प्रज्ञा सरवदे मँडम, पोलीस महासंचालक, लोहमार्ग मुंबई यांची भेट घेणार असल्याचे एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...