Wednesday, 14 September 2022

कुणबी समाज संघटना, कोतळूक ( मुंबई ) तर्फे नाट्यप्रयोगाचे आयोजन !

कुणबी समाज संघटना, कोतळूक ( मुंबई ) तर्फे नाट्यप्रयोगाचे आयोजन ! 


मुंबई - ( दिपक कारकर ) : गुहागर तालुक्यातील देशभक्त ना. गोपाळकृष्ण गोखले यांची जन्मभूमी असलेल्या कोतळूक गावातील गेली अनेक वर्षे कला, क्रिडा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या कुणबी समाज संघटना, कोतळूक ( मुंबई ) मंडळातर्फे मुंबईतील शिवाजी मंदिर, दादर येथे मंडळाच्या उन्नतीसाठी नाट्यप्रयोगाचे आयोजन रविवार दि.२५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० : ०० वा. करण्यात आले आहे. दरम्यान नाट्यलेखक सदानंद चव्हाण लिखित आणि विजय भुजबळराव दिग्दर्शित "प्रेमाचा गोलमाल" या दोन अंकी धम्माल विनोदी नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. या उपक्रमाला मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संजय आगिवले - ९८३३१९८१११ यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...