Wednesday, 14 September 2022

वीर गावच्या तरुणांचा स्तुत्य उपक्रम ; मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

वीर गावच्या तरुणांचा स्तुत्य उपक्रम ; मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ! 


कोकण - (  दिपक कारकर  ) : 

चिपळूण तालुक्यातील निसर्गरम्य वीर गावच्या युवकांनी नुकताच गणेशोत्सव सणांच्या दिवसांत मोफत आरोग्य शिबीर हा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाचे संकल्पक वीर गावचे भूमिपुत्र दशरथ जावळे, चंद्रकांत जावळे आणि शशिकांत जावळे यांनी प्रचंड मेहनत घेऊन सामाजिक सौख्य राखणारा उपक्रम वाडीतील ग्रामस्थ-महिला मंडळ, निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. "आरोग्य सौख्य नांदेल घराघरा, जर निरोगी असेल वसुंधरा" ही विचारधारा मनी रुजवत दि. ०४ सप्टेंबर २०२२ रोजी,ग्रामपंचायत कार्यालय, वीर येथे एकदिवसीय मोफत आरोग्य शिबीर नियोजित केले होते. ह्या शिबिराला वैद्यकीय अधिकारी सिव्हिल हॉस्पिटल, ( नाशिक ) मधील डॉ.शंकर आळणे ( बी.ए. एम.एस. ) यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले. संधीवात, पित्त, ताप, सर्दी, खोकला, खाज खूजली आदी लहान मोठ्या आजारांवर उपचार ह्या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना देण्यात आले.या उपक्रमाला श्री मोरेश्वर मित्र मंडळ आणि महिला मंडळ ( खालची जावळे वाडी ) व वीर गावच्या विद्यमान सरपंच श्रेया वीरकर यांनी विशेष योगदान दिले. अनेक मित्र परिवार यांनी देखील आर्थिक स्वरूपात सहकार्य केले. दरम्यान वीर गावचे गावकर नारायण दूर्गोळी, कारभारी वसंत जावळे, यशवंत जावळे, बारका जावळे, रामचंद्र जावळे, उपसरपंच - सुभाष जावळे, वीर गावचे वरीष्ठ नागरिक, ग्रामस्थांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. सद्यस्थितीत धावपळीच्या युगात आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त उपक्रम हाती घेऊन, वाडीतील नागरिकांना विनामूल्य आरोग्य सेवा देणाऱ्या ह्या उपक्रमाचे पंचक्रोशीतुन अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...