मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
मायेची सावली एक हात कर्तव्याचा या शिवसेना प्रणित संस्थेतर्फे कट्टर हिंदुत्ववादी , निष्ठावंत शिवसैनिक तसेच हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेबानी सांगितल्याप्रमाणे ८०% समाजकारण २०% राजकारण हेच उद्दिष्ट समोर ठेवून पक्षबांधणीसाठी अहोरात्र झटणारे व गोर-गरीब व दुर्बल गरजवंत नागरिकांसाठी मदत करणारे श्री. नागेंद्र राठोड यांची शिवसेना महाड तालुका संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक श्री.यशवंत खोपकर, संचालक श्री. अवि राऊत, अध्यक्ष श्री. रवींद्र जाधव, श्री. गणेश काळे, श्री. संदीप चांदिवडे, श्री. विनायक जाधव, श्री. सदाशिव लाड़, श्री. विश्वनाथ जाधव, श्री. प्रमोद चौंडकर, श्री. राम वैद्य, श्री. रतन ताजणे, श्री.विश्वास तेली उपस्थित होते.

No comments:
Post a Comment