Wednesday, 14 September 2022

मुंबईतील झवेरी बाजारात ईडीने मारलेल्या छाप्यात ९२ किलो सोन्यासह तब्बल ३३० किलो चांदी जप्त !

मुंबईतील झवेरी बाजारात ईडीने मारलेल्या छाप्यात ९२ किलो सोन्यासह तब्बल ३३० किलो चांदी जप्त !


भिवंडी, दिं,१४, अरुण पाटील, (कोपर )
      अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबईतील झवेरी बाजारात चार छापे मारले. यात सराफा व्यापाऱ्याकडून ९२ किलो सोने आणि३३० किलो चांदी जप्त केली. ही कारवाई आज करण्यात आली, अशी माहिती इडीकडून देण्यात आली आहे.
          मेसर्स रक्षा बुलियन आणि मेसर्स क्लासिक मार्बल्सशी संबंधित ही छापेमारी होती. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशन राबविले. मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेडच्या प्रकरणातील मनी लाँड्रिंग चौकशीचा या कारवाईचा संबंध आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.
            ८ मार्च २०१८ रोजी मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीने बँकांना फसवून २२९६.५८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर विविध कंपन्यांच्या माध्यमातून लेअरिंग करून पैसे पाठवले होते. असुरक्षित कर्ज आणि गुंतवणूक प्रदान करण्याच्या, कर्ज घेण्यासंदर्भात कोणतेही करार झालेले नाहीत. यापूर्वी ईडीने ४६.९७ कोटी आणि १५८.२६ कोटी रुपये संलग्न केले आहेत.
          झडती दरम्यान परिसरात खासगी लॉकरच्या चाव्या सापडल्या. मेसर्स रक्षा बुलियनच्या खाजगी लॉकर्सची झडती आज घेतली गेली. ईडीच्या छापेमारीत योग्य नियमांचे पालन न करता व्यवहार केले जात होते. केवायसीचे पालन केले गेले नाही, आवारात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला नव्हता. आत आणि बाहेर कोणतेही रजिस्टर नव्हते असे दिसून आले.
            लॉकर परिसराची झडती घेतली असता ७६१ लॉकर्स असल्याचे समोर आले आहेत. मेसर्स रक्षा बुलियन. लॉकरमध्ये ९१.५ किलो सोने आणि १५२ किलो चांदी सापडली. २ लॉकरही ताब्यात घेण्यात आले असून यात अतिरिक्त १८८ किलो चांदी जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत ४७.७६ कोटी आहे. ईडीकडून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...