एरंडोल, बातमीदार... तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाची बैठक घेण्यात आली. तालुक्यातील २० सभासदां पैकी ८ सभासद. ५ हितचिंतक १३ जण हजर होते. तालुका सचिव संजय बागड सर अपघात झाल्याने गैरहजर होते.!!.
या बैठकीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते अमृत महाजन यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात म्हणाले की, जनतेचे महत्त्वाचे प्रश्न महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे शोषण व आत्महत्या मजुरांची रोजगाराचे प्रश्न कामगारांच्या वेतनाचे प्रश्न महत्त्वाचे असून जात धर्म बाजूला सारून कष्टकऱ्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याखाली एकत्र यावे तालुक्यात कम्युनिस्ट पक्ष मजबूत करावा अशी आवाहन त्यांनी केले, एकत्र यावे असे आवाहन केले.
या बठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडू नये.. त्यांचे महाग बी, बियाणे, खते, मजुरी, खर्च करून उत्पादनाला भाव मिळत नाही, त्यांचे हाल होतात हा अपवादात्मक साल सोडले तर नित्याचे होऊन बसले आहे सरकारने त्यांना मदत द्यावी असा ठराव कॉ. कल्पना पाटील यांनी मांडले..
वन्य प्राण्यांपासून शेतीचे पिकांचे संरक्षणासाठी कुंपणे बांधा असाही ठराव बैठकीचे अध्यक्ष रघुनाथ महाजन यांनी मांडला.. पुढील तीन वर्षासाठी कॉम्रेड श्री संजय बागड यांची सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली व सह सेक्रेटरी म्हणून तुषार मोरे सह पाच जणांची कमिटी तयार करण्यात आली त्यात आत्माराम अहिरे एडवोकेट वासुदेव वारे, रघुनाथ महाजन समावेश आहे. विखरण येथील चार जणांनी पक्ष सभासदत्व घेतले बैठकीसाठी नागोबा पंचमढीचे प्राजक्ता डहाके नाना महाजन किशोर महाजन यांनी सहकार्य केले.





No comments:
Post a Comment