Sunday, 4 September 2022

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी बंधनकारक !

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी बंधनकारक !


जव्हार- जितेंद्र मोरघा :

जव्हार तालुक्यातील पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकर्‍यांना ई केवायसी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ दिला जात आहे. पात्र शेतकर्‍यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्र, सेतु सेवा केंद्र ठिकाणी जाऊन आपली ई केवायसी ७ सप्टेंबर २०२२पर्यंत अपडेट करुन घेणे बंधनकारक आहे. 


ज्या शेतकर्‍यांनी ७ सप्टेबर २०२२ पर्यंत ई केवायसी केली नाही त्या शेतकर्‍यांना या पुढील लाभ मिळणार नाही. असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. शेतकर्‍यांकडे ई केवायसी अपडेट करण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक असणे बंधनकारक आहे. जव्हार तालुकाक्यातील पी एम किसान योजनेतील पात्र व ई केवायसी अपडेट न केलेल्या शे तकर्‍यांनी ७ सप्टेंबर २०२२ पुर्वी ई केवायसी करुन घ्यावी असे आवाहन तहसीलदार जव्हार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...