जव्हार- जितेंद्र मोरघा :
जव्हार - जव्हार तालुक्यात गावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे. तसेच अनेक मंडळांनी सांस्कृतिक आणि शैक्षणीक उपक्रम आयोजित केले आहेत. यावेळी गणेशोत्सवाचे औचित्य साधून जव्हार तालुक्यातील कासटवाडी जि. प. गटाच्या सदस्या पालघर जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती गुलाब विनायक राऊत यांनी गणेश मंडळांना प्रसाद व संस्कृती कार्यक्रमा साठी आर्थिक मदत केली आहे .
तालुक्यातील कासटवाडी जिल्हा परिषद गटामध्ये दहा ग्रामपंचायत आहेत. या गटात अनेक गावात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आले आहेत. कोगदा येथील पाच मंडळांना प्रसादाचे वाटप केले आहे. तर ओझर, ओझरकुंड, पिंपळशेत, आकरे, चामभाशेत, तिलोडा, अश्या अनेक गावांना प्रसाद व सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमासाठी आर्थिक मदत गणेश मंडळाना केली आहे. गुलाब ताई या नेहमीच त्यांच्या गटातील गावात जाऊन गावातील अडचणी जाणून घेतात. त्या अडचणी सोडवून गोरगरिबांना नेहमीच मदत करीत आल्या आहेत. यावेळी सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून महिला बालकल्याण सभापती गुलाब राऊत यांनी मंडळांना प्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रम साठी आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे अनेक मंडळांनी त्यांचे आभार मांनले आहेत. यावेळी त्यांच्या सोबत माजी प. स. सदस्य विनायक राऊत, माजी सरपंच गणपत भोये, सुरेश भोये सर, पत्रकार नामदेव खिरारी सोबत होते.

No comments:
Post a Comment