Saturday, 3 September 2022

वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर उपाध्यक्ष प्रवीण बापूराव गायकवाड यांचे निधन !

वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर उपाध्यक्ष प्रवीण बापूराव गायकवाड यांचे निधन !


पुणे, बातमीदार : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर उपाध्यक्ष प्रवीण बापूराव गायकवाड (वय 59) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे खाजगी रुग्णालयात नुकतेच निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. आंबेडकरी चळवळीतील विविध संस्था-संघटना सह धार्मिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. मंत्रालय मुंबई येथून कक्ष अधिकारी म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वडगावशेरी विधानसभेची निवडणूक देखील त्यांनी लढविली होती.

त्याच्या पुणे शहर कार्यकारिणीचे ते उपाध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिवावर येरवडा स्मशान भूमी येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. अत्यंत शांत व मनमिळावू स्वभावाचे गायकवाड यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह मित्र परिवार नातेवाईक तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मोठा धक्का बसला आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...