Saturday, 3 September 2022

ठाण्यातील कृत्रिम तलावात बुडून सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू !

ठाण्यातील कृत्रिम तलावात बुडून सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू ! 


ठाण्यातील राबोडी येथील कृत्रिम तलावात सात वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणपती विसर्जनासाठी तलाव तयार करण्यात आले होते. या तलावामध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने मुलाचा मृत्यू झाला. काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

जैहद अजहर शेख या ७ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला आहे. ठाण्यातील राबोडी अपना नगर-गल्ली क्र. १ मध्ये जैहद अजहर शेख राहत होता. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावातील पाण्यात जैहद हा पोहण्यासाठी उतरला. त्यावेळी त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे, असे आपत्ती व्यवस्थापनाकडून संदेश जारी करण्यात आला आहे. मात्र या हलगर्जीपणाला कोण जबाबदार असे स्थानिक म्हणत आहे.

मृत्यू नंतर सुरक्षा व्यवस्था या अपघातानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आहे. आता प्रशासनाने या कृत्रिम तलावाला संरक्षण दिले आहे. या बाबत स्थानिकांनी रोष व्यक्त केला असुन सुरक्षा आधीच दिली असती, तर हा अपघात झालाच नसता, असा आरोप त्यांनी प्रशासनावर केला आहे.

No comments:

Post a Comment

यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !

यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ! ...